घरपालघरवसईतील रिक्षा दरवाढीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

वसईतील रिक्षा दरवाढीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

Subscribe

वसई-विरार शहरातील काही प्रमुख प्रलंबित विषय आणि विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

वसईः मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वसई-विरार शहरातील रिक्षा दरवाढीचा प्रश्न अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात पोहचला आहे. शहरात रिक्षा शेअर -ए- रूटचे भाडेदर निश्चित नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दाखल घेत राज्याच्या परिवहन आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. वसई-विरार शहरातील काही प्रमुख प्रलंबित विषय आणि विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. विरार शहरातील नागरिकांच्या सोईसाठी विरार ते ठाणे या मार्गावर टीएमटीची स्वतंत्र बस सेवा सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना तात्काळ दूरध्वनीवरून निर्देश दिले.

वसई-विरार शहर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे, या दृष्टीने शहरातील सर्व मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना वसई-विरार शहर आयुक्तांना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे वसई-विरार शहर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधले. त्यावर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भेटीत पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव, वसई तालुका अध्यक्ष दुशांत पाटील व प्रहारचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -