घरपालघरसर्वाधिक लिंक विक्रमगडला तर सर्वात कमी नालासोपाऱ्यात

सर्वाधिक लिंक विक्रमगडला तर सर्वात कमी नालासोपाऱ्यात

Subscribe

अद्यापपर्यंत विक्रमगड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक जास्त लिंक झाले असून नालासोपारा विधानसभा मतदार संघात सर्वात कमी मतदार ओळख पत्र आधारशी लिंक झाले आहेत.

पालघर: देशभरात सध्या मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदाराची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करण्याच्या उद्देशाने देशभरात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंकिंग केले जात आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ही मोहीम सुरू आहे. पालघर लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा क्षेत्रात ही हे मोहीम जोमाने सुरू असून अद्यापपर्यंत विक्रमगड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक जास्त लिंक झाले असून नालासोपारा विधानसभा मतदार संघात सर्वात कमी मतदार ओळख पत्र आधारशी लिंक झाले आहेत.

पालघर लोकसभा मतदार संघात पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा आणि वसई असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या एकूण सहा मतदारसंघात २० लाख ११ हजार ९९८ मतदार आहेत. दरम्यान, ३० ऑगस्टपर्यंत ७० हजार ४५२ मतदार आधारशी जोडले गेले आहेत. पालघर जिल्ह्यात १७ ऑगस्टपर्यंत आधार जोडणी प्रक्रिया अंतर्गत ११,७५२ मतदारांचे कार्ड ‘आधार’शी जोडण्यात आले. त्यानंतर पालघर जिल्हा निवडणूक विभागाने या प्रक्रियेला अधिक जोर देत अवघ्या १३ दिवसांत ७०, ४५२ मतदार कार्ड आधारशी जोडण्याचे काम केले आहे, मात्र तरीही ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात फक्त ३.५ टक्के एवढेच काम झाले असून अजून या प्रक्रियेने वेग घ्यावा, यासाठी निवडणूक विभागाने जोरात प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आधार जोडणी विक्रमगड विधानसभा मतदारसंघात झालेली आहे, तर सर्वात कमी जोडणी नालासोपारा मतदारसंघात झाली असल्याची माहिती पालघर जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे.

- Advertisement -

चौकट.1
देशात पॅनकार्डसोबत आधार लिंक करणे आधीच आवश्यक होते. आता मतदार ओळखपत्राशीही आधार लिंक करणे आवश्यक झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एका व्यक्तीकडे फक्त एकच मतदार ओळखपत्र असेल आणि ज्यांनी एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे ठेवली आहेत त्यांची ओळख पटवल्यास बनावट ओळखपत्र दूर होण्यास मदत होईल.

चौकट.2
सर्वाधिक जोडणी विक्रमगडला
पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ असून सर्वाधिक आधार जोडणी विक्रमगड मतदारसंघात ३२ हजार ३८८ झाली आहे. त्या तुलनेत अन्य मतदारसंघांत आधार जोडणी कमी झालेली आहे.

- Advertisement -

चौकट.3
सर्वात कमी नालासोपाऱ्यात
जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी नालासोपारा या मतदारसंघात सर्वात कमी १ हजार ६७९ आधार जोडणी झालेली आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, मात्र आधार जोडणीत हा मतदारसंघ मागे पडला आहे.

प्रतिक्रिया :
मतदार यादीचा तपशील आधार संलग्न करून मतदार
यादीचे शुद्धीकरण होऊन दुबार तसेच मयत नावे बाद
होणार आहेत. याबाबत मतदारांमध्ये जनजागृती सुरू असून लवकरच आधार जोडणी प्रक्रियेला वेग येईल.
-अपर्णा सोमाणी आरोलकर,
उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -