सध्या सर्वत्र नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याचं निमित्ताने विविध तिर्थ क्षेत्रीच्या देवीदेवतांना सुंदर पोशाख घालून सजवलं जातं. पंढरपूरच्या विठ्ठळ रूक्मिणी देवीला देखील नवरात्री निमित्त सुंदर पोशाख घालून सजवण्यात आलं. यावेळी विठ्ठलाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं. तर देवी रुक्मिणीला देखील करवीरनिवासिनी अंबाबाईसारखा साज श्रृंगार करण्यात आला होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात साक्षात देवी महालक्ष्मी अवतारल्याचा भास होत होता. देवीचे हे रूप पाहण्यासाठी भाविकांची मंदिराबाहेर रांग लागली होती. नवरात्री निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मंदिरातही सुंदर सजावट करण्यात येत आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -