अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘वीज आंदोलन’

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून आज पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. विरोधकांनी काल कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मंगळवारी विरोधकांनी आक्रमक भूमिका मांडली होती. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली असून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज द्या अशी, मागणी करत विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर शिंदेंचे सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.