घरराजकारणशरद पवारांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

शरद पवारांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Subscribe

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या रामदास कदम यांनी केला आहे. विशेष म्हणजे, शिदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी देखील अलीकडेच शिवसेनेतील प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप केला होता.

टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी आजन्म संघर्ष केला. हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास त्यांनी सोडली नाही. त्यांना आज संपूर्ण जग ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून ओळखते आणि त्यांच्याच मुलाने याच दोन पक्षांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद स्वीकारले, अशी टीका रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली.

- Advertisement -

मी उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली होती की, या दोन्ही काँग्रेसबरोबर बसू नका. त्यांना ते नाही पटले. त्यावेळी मातोश्रीची पायरी उतरलो, ते पावणेतीन वर्षे झाली आजपर्यंत पुन्हा ती पायरी चढलो नाही. हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष नाही, असे सांगून रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे भोळे होते, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगतात. पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरेच भोळे आहेत. त्यांना शरद पवार यांचा डाव समजला नाही. त्यांनी आज आमचा पक्ष फोडला. हीच भीती आमच्या मनात होती.

हेही वाचा – अल्पसंख्याकांमध्ये 73 टक्क्यांहून अधिक मुस्लीम; मात्र ऑफिसर्स क्लार्कच्या नोकऱ्यांमध्ये ख्रिश्चनांचे वर्चस्व

- Advertisement -

कोकणात कुणबी समाजाला बरोबर घेऊन, शासनाचे पाच-पाच कोटी रुपये देऊन शिवसेना कशी फोडता येईल, यासाठी शरद पवार प्रयत्न करत असल्याचा दावा मी यापूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता. त्यावेळी यासंबंधीची सर्व कागदपत्रे मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच मातोश्रीवर पाठवली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेतली असती तर, ना एकनाथ शिंदे यांच्यावर आणि ना त्यांच्याबरोबरच्या ५१ आमदारांवर ही वेळ आली असती, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेतील प्रत्येक फुटीच्या मागे शरद पवार असल्याचा आरोप केला होता. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, त्यामागे शरद पवारांचाच हात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शरद पवार यांनी त्यांना यातना का दिल्या हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असे आवाहनही केसरकर यांनी केले होते. आता रामदास कदम यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – आईसाठी मदत करा म्हणत चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणूक

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -