घरराजकारणमोठी बातमी:सदा सरवणकरांवर आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल; फडणवीसांनी दिली माहिती

मोठी बातमी:सदा सरवणकरांवर आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल; फडणवीसांनी दिली माहिती

Subscribe

सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:चं शस्त्र दुसऱ्याला दिल्याप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत ठाकरे गट आणि शिवसेनेत झालेल्या राड्याच्या प्रकरणात आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे. सदा सरवणकर यांच्यावर आर्म्स अॅक्टसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:चं शस्त्र दुसऱ्याला दिल्याप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती विसर्जनावेळी प्रभादेवी येथे  ठाकरे गट आणि शिवसेनेत झालेल्या राड्यावेळी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तुलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

- Advertisement -

( हेही वाचा: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? हक्कभंग प्रकरणी मोठी अपडेट समोर )

आमदार सदा सरवणकर यांचा शस्त्र परवाना रद्द होणार असल्याची माहिती, गृहमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे. सरकारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना क्लिन चिट दिली गेल्याचे आरोप, विरोधकांकडून होत होते. आता यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली.

- Advertisement -

काय म्हणाले फडणवीस

राज्यात लोकप्रतिनीधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 आरोपींवर कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

तसेच, त्यांचे जे लायसन्सधारी पिस्तूल आहे ते त्यांनी स्वत: सोबत बाळगायला हवे होते मात्र त्यांनी ते गाडीत ठेवले, असे ठेवता येत नाही. त्यामुळे आर्म्स अॅक्ट 1969 चे कलम 30 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. लायसन्स आणि शर्थी नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांना जो काही शस्त्र परवाना दिला आहे तो रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

प्रभादेवी येथील मिरवणुकीत ठाकरे गट आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली होती. या वादावेळी दादर पोलीस ठाण्यात गोळीबारीची घटना घडली होती.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतूसे आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल आला. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळारुन जप्त केलेले काडतूसे आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -