घरराजकारणएकनाथ शिंदे यांचे 2014पासूनच शिवसेनेत खच्चीकरण! नेता नाही, उपनेता नाही आणि स्टार...

एकनाथ शिंदे यांचे 2014पासूनच शिवसेनेत खच्चीकरण! नेता नाही, उपनेता नाही आणि स्टार प्रचारकही नाही

Subscribe

मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022मध्ये बंडाचे निशाण फडाकवले होते. त्यावेळी आम्ही मंत्रीपद देऊनही ‘गद्दारी’ केल्याचा ठपका ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत असला तरी, वस्तुस्थिती वेगळीच आहे. 2014पासूनच शिंदे यांची नोंद ना नेत्यांमध्ये होती, ना त्यांना उपनेते केले होते. हे कमी म्हणून की काय, 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतही त्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्यावर मातश्रीची वक्रदृष्टी गेल्या आठ वर्षांपासूनच होती, हे स्पष्ट होते.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. हे बंड का केले, याचा खुलासा करताना या आमदारांनी दोन्ही काँग्रेसबरोबरच्या आघाडीला लक्ष्य केले असले तरी, यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण त्यांनी सांगितले ते म्हणजे, म्हणजे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या काही ‘नेत्यां’मुळेच बंड केल्याचे काही आमदारांनी सांगितले होते. पण या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे नव्हते.

- Advertisement -

अगदी 2014पासून एकनाथ शिंदे मंत्रीपद भूषवत असलेले तरी ते अडगळीतच होते. 2014च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून ‘स्टार प्रचारकां’ची यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती. एकूण 38 नावांच्या यादीत नवखे असलेले लक्ष्मण वडले, ‘होम मिनिस्टर’फेम आदेश बांदेकर, सुहास सामंत, डॉ. संजय उपाध्ये यांचा समावेश होता, पण एकनाथ शिंदेची ‘स्टार प्रचारक’ म्हणून दखल घेतली गेली नाही. अनंत तरे वगळता ठाणे जिल्ह्यातील एकही नेता या यादीत नव्हता.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना 16 सप्टेंबर 2014 रोजी सादर केलेल्या 38 स्टार प्रचाराकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा समावेश होता. तर, शिवसेनेचे 7 नेते, 16 उपनेते, 3 सचिव, 2 खासदार आणि 6 पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र शिवसेनेच्या या महत्त्वपूर्ण यादीत एकनाथ शिंदे यांचा उल्लेख नसल्याने सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत होते.

- Advertisement -

त्याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यावेळी असलेल्या नगरविकास खात्यामध्ये मातोश्रीवरून हस्तक्षेप केला जात असल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे एकूणच एकनाथ शिंदे यांना पक्षात दुय्यम स्थान होते आणि खाते देऊनही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते, याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून वारंवार केला आहे. आधी राज्यसभा निवडणूक आणि नंतर विधान परिषद निवडणूक ही निमित्तमात्र ठरली आणि पक्षातील कोंडीचा उद्रेक झाला. त्यातून महाराष्ट्रात अडीच वर्षांत सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -