घररायगडपूरपरिस्थितीवर ील उपाययोजनेस दिरंगाईमुळे महाडकर आक्रमक, पुरेशी यंत्रणा उपलब्ध न केल्याने काढला...

पूरपरिस्थितीवर ील उपाययोजनेस दिरंगाईमुळे महाडकर आक्रमक, पुरेशी यंत्रणा उपलब्ध न केल्याने काढला मोर्चा

Subscribe

महाडकर नागरिक पूरपरिस्थितीवर आक्रमक झाले असून सद्य स्थितीत सुरु असलेल्या गाळ काढण्याच्या कामाला गती देण्यात यावी आणि पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी या मोर्चावेळी करण्यात आली.

महाड शहरात गेल्या अनेक वर्षापासून येणार्‍या पुरावर शासनाकडून केल्या जाणार्‍या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर आक्रमक झाले आहेत. शनिवारी सकाळी महाडमधील नागरिकांनी महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

महाड शहरात सातत्याने पूर येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होते. सन २०२१ मध्ये महाड शहरात महापूर आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या महापुरानंतर महाडच्या पूरपरिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत शासन दरबारी योग्य पावले उचलली जात नसल्याने आणि केल्या जाणार्‍या उपायांबाबत पुरेशी यांत्रिक साधने उपलब्ध होत नसल्याने शनिवारी सकाळी महाड पूर निवारण समितीतर्फे महाड उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाडमधून शेकडो नागरीक सहभागी झाले होते. संपूर्ण बाजारपेठेतून घोषणा देत हा मोर्चा महाड उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. महाडमध्ये या समितीकडून महाड बंदचे देखील आवाहन करण्यात आल्याने शहरातील बहुतांश दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

शहरात चौक सभा घेत याबाबत जागृती केली जात आहे. महाडकर नागरिक पूरपरिस्थितीवर आक्रमक झाले असून सद्य स्थितीत सुरु असलेल्या गाळ काढण्याच्या कामाला गती देण्यात यावी आणि पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी या मोर्चावेळी करण्यात आली. शहरातील सर्व पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. शासनाने महाडकर नागरिकांच्या भावनांचा विचार करून सुरु असलेल्या कामाला गती दिली नाही तर पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -