घररायगडरस्त्यासाठी मुकुंदनगरवासियांचे खोपोली नगरपरिषदेसमोर उपोषण

रस्त्यासाठी मुकुंदनगरवासियांचे खोपोली नगरपरिषदेसमोर उपोषण

Subscribe

मुकुंदनगरमधील सर्वे नंबर ८ व हिस्सा नंबर २ सिटीएस नं.५३४८ मधून राहत्या जागेत येण्या-जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही. अधिकृत रस्ता मिळण्यासाठी मुकुंदनगर वासियांनी खोपोली परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांना रस्ता मिळाला नाही.

मागील २० वर्षापासून वारंवार अर्ज, निवेदन देऊनही, तसेच नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन आणि मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या गाड्या अडवत रास्ता रोको करुनही खोपोलीतील मुकुंदनगरमधील रहिवाशांनीा हक्काचा रस्ता मिळाला नाही. त्यामुळे अखेर मुकुंदनगर वासियांनी खोपोली नगर परिषदेसमोर उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.

मुकुंदनगरमधील सर्वे नंबर ८ व हिस्सा नंबर २ सिटीएस नं.५३४८ मधून राहत्या जागेत येण्या-जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही. अधिकृत रस्ता मिळण्यासाठी मुकुंदनगर वासियांनी खोपोली परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांना रस्ता मिळाला नाही. दरम्यान, नगराध्यक्ष सुमनताई औसरमल, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी खाजगी जागेतून सिलेंडर वाहन, अ‍ॅम्बुलन्स व शाळा बस, रिक्षा जाण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. रस्ता देतानाच अटी व शर्ती घालण्यात आल्या होत्या. तसेच अटींचे उल्लंघन केल्यास रस्ता बंद करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, हा खासगी जागेतील रस्ता बंद करण्यात आल्याने हक्काचा व कायमस्वरूपी रस्ता मिळावा, यासाठी मुकुंदनगरमधील नागरिकांनी अनेक महिन्यांपासून खालापूर तहसीलदार अय्युब तांबोळी व मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे पाठपुरावा केला. पण वारंवार अर्ज व निवेदन देवूनही हक्काचा रस्ता मिळत नसल्याने अखेरीस बुधवारी २ मार्च रोजी खोपोली नगर परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.

मुकुंदनगरची जागा जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने एनए नुसार आहे. तसेच खोपोली नगर परिषदेनेही बांधकामास परवानगी दिली आहे. नागरिकांनी ६ ऑक्टोबर २०१९ रोजी उपोषण केले असता खोपोली नगर परिषदेने सदर रस्ता देवू किंवा पर्यायी रस्ता देवू असे लेखी पत्र दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. अखेर खोपोली नगर परिषदेला पुन्हा ८ जुलै २०२१ रोजी रस्त्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर रस्ता मिळाला, पण कायमस्वरूपी नसल्याने काही दिवसांतच बंद करण्यात आला. त्यामुळे मुकुंद नगरवासियांनी कुणी, रस्ता देता का? रस्ता? अशी विनवणी करत उपोषण सुरू केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -