घररायगडआ. राजन साळवी यांच्यासह कुटुंबाची दिवसभर चौकशी; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?

आ. राजन साळवी यांच्यासह कुटुंबाची दिवसभर चौकशी; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?

Subscribe

रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आ. राजन साळवी यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा सुरूच ठेवला आहे. आ. साळवी यांनी रत्नागिरी येथील राहाटगर येथे जमीन खरेदीसाठी व रत्नागिरीतील हॉटेल बांधकामासाठी उसनवारी घेतलेल्या ११ जणांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात आ. राजन साळवी, त्यांची पत्नी, २ मुले, भाऊ आणि मित्र अशा ६ जणांची शुक्रवारी दिवसभर चौकशी केली. दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत ही चौकशी सुरु होती. या चौकशीमुळे आ. राजन साळवी यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

 

अलिबाग : रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आ. राजन साळवी यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा सुरूच ठेवला आहे. आ. साळवी यांनी रत्नागिरी येथील राहाटगर येथे जमीन खरेदीसाठी व रत्नागिरीतील हॉटेल बांधकामासाठी उसनवारी घेतलेल्या ११ जणांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात आ. राजन साळवी, त्यांची पत्नी, २ मुले, भाऊ आणि मित्र अशा ६ जणांची शुक्रवारी दिवसभर चौकशी केली. दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत ही चौकशी सुरु होती. या चौकशीमुळे आ. राजन साळवी यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

बेकायदा मालमत्ताप्रकरणी आ. राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा साळवी, भाऊ दीपक साळवी, मुले शुभम साळवी व अथर्व साळवी तसेच दीपक साळवी यांचा मित्र सुरेंद्र भाटकर अशा सहा जणांची चौकशी अलिबागमधील पिंपळभाट येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उप अधीक्षक कार्यालयात १८ व १९ एप्रिल रोजी करण्यात आली होती. या चौकशीनंतर पुन्हा चौकशीला बोलावले जाणार नसल्याचे साळवी यांना वाटले होते. परंतू लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत संपर्कात येणार्‍यांचीदेखील चौकशी सुरु केली आहे. साळवी यांंनी राहाटगर येथे घेतलेल्या आठ गुंठे जागेच्या खरेदीसाठी तसेच रत्नागिरीमधील उभारण्यात आलेल्या साळवी हॉटेल व रिसॉर्टच्या बांधकामासाठी रत्नागिरीमधील वैभव बिल्डर्स, शरद बाणी राणे, मेसर्स पॉलीट्रांस तर्फे विलास माधव मुळे, देसाई एटरप्रायझेस तर्फे निखील देसाई, साळवी बिल्टअप, एटरप्रायझेस तर्फे अनुराधा दीपक साळवी,अनिल देसाई तसेच कोल्हापूरमधील दिलीप हिंदुजा, रत्नागिरीमधील गणपत झोरे, नारायण मेस्त्री, साळवी बिल्टअप, सुदर्शन एटरप्रायझेस या ११ जणांकडून उसनवारी केली होती.

जागा खरेदी करण्यापासून हॉटेल बांधकामापर्यंत साळवी यांच्यासमवेत आर्थिक संबंध आलेल्या ११ जणांनालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलावले होते. त्यामध्ये सहा जणांना यापूर्वीही बोलावले होते. आ. राजन साळवी यांच्या समवेत अन्य ५ जणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दुपारी बारा वाजता चौकशी सुरु झाली. सायंकाळी उशीरापर्यंत ही चौकशी सुरु होती.

- Advertisement -

 न्याय देवतेवर विश्वास आहे

कुटूंबाची चौकशी झाल्यावर चौकशी थांबेल, असा विश्वास होता. परंतू रत्नागिरीमधील जागेसह हॉटेलच्या बांधकामासाठी मित्रमंडळीनी केलेल्या आर्थिक सहकार्याचीदेखील चौकशी सुरु केली आहे. यामध्ये सहभाग असलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून ससेमिरा चालू ठेवला आहे. मात्र न्याय देवतेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -