घररायगडमातीसह प्लास्टरच्या मूर्तींचीही मागणी वाढली

मातीसह प्लास्टरच्या मूर्तींचीही मागणी वाढली

Subscribe

गणपतीचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ओळख असणार्‍या पेण तालुक्यातील पेण शहर, हमरापूर, जोहे, कळवे यासह इतर भागात मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्तींना भक्तांची मागणी वाढली आहे.

गणपतीचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ओळख असणार्‍या पेण तालुक्यातील पेण शहर, हमरापूर, जोहे, कळवे यासह इतर भागात मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्तींना भक्तांची मागणी वाढली असून मागील १५ वर्ष सुरु असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्याकडे न्यायालयीन लढाई लढत असल्याचे महाराष्ट्र राज्य गणेश मुर्तीकार संघटनेचे सल्लागार तथा पेण संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पेण मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीची निर्मिती करणारे ५०० च्या अधिक कारखान्यांमध्ये मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रंगबेरंगी गणेशमूर्ती तयार होत असतांना दरवर्षी पेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांची मागणी वाढली आहे. पेणमधून तब्बल सुमारे १० ते १२ लाख गणेशमूर्तीचे वितरण कर्नाटक, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांसह परदेशातील आस्टेलिया, अमेरिका, आशिया व युरोप खंडातील अनेक देशांमध्ये झाले असून यामध्ये मागील १५ वर्ष याकरता सामाजिक आणि राजकीय न्यायालयीन लढाई लढत आहोत. २०२० मध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समोर बैठक झाली. याबात जावडेकरांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले असले तरी मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्याबाबत खरी लढाई प्रदुषण मंडळाविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्याकडे सुरु आहे.
त्यामुळे पेणमधील गणेशमुर्ती कारखान्यांमध्ये मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या लाखो मुर्ती तयार असून या रंगबेरंगी गणेशमूर्तींना अधिकची पसंती भक्तांनी दिली आहे. पेणच्या गणेशमुर्तींच्या कारखान्यात साधारण २ लाख ५० हजार नागरीक यावर उपजीविका चालवित असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करुन सदर प्रश्न मार्गी लावण्यात यावे, अशीही मागणी सर्व गणेश मुर्तीकारांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य गणेश मुर्तीकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, कैलास पाटील, दिपक समेळ, नितीन मोकल, राजन पाटील, संजय पाटील, सागर हजारे, स्वप्निल सुतार, कृणाल दाभाडे, चाचड, सागर पवार आदिंसह मुर्तीकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -