घरक्रीडा'हा' खेळाडू झाला दुखापतग्रस्त; भारतीय संघाला धक्का बसण्याची शक्यता

‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्त; भारतीय संघाला धक्का बसण्याची शक्यता

Subscribe

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात ९ जूनपासून टी-२० मालिका (T-20) सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Team) सराव करत आहे. या मालिकेसाठी निवड झालेले सर्व खेळाडू सध्या सराव करत आहे.

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात ९ जूनपासून टी-२० मालिका (T-20) सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Team) सराव करत आहे. या मालिकेसाठी निवड झालेले सर्व खेळाडू सध्या सराव करत आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Batman Mayank Agarwal injured as ball hit on his head and ribs)

लवकरच संघात नंबर लागणार

- Advertisement -

सध्या रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने सुरू असून, या मालिकेच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी मयंकची निवड झालेली नाही. मात्र रोटेशन पॉलिसीनुसार, त्याचा लवकरच संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

प्रत्येक क्षणी निवड समितीची नजर

- Advertisement -

मयंक अग्रवालच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. मयंक सध्या संघाबाहेर असला तरी त्याच्या कामगिरीवर प्रत्येक क्षणी निवड समितीची नजर आहे. दरम्यान, ही घटना सामन्याच्या सातव्या षटकात घडली. वेगवान गोलंदाज शिवम मावी पहिले षटक टाकण्यासाठी आला. मावीने शेवटचा चेंडू शॉर्ट पिच टाकला. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला असता, हा चेंडू त्याच्या हाताला लागून बरगड्यांना लागला.

चेंडू अंगावर लागल्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसला. त्यानंतर फिजिओ मैदानावर आले आणि मयंकवर उपचार केले. मयंकने फलंदाजी सुरूच ठेवली, पण नंतर तो फार काही करू शकला नाही आणि १० धावा करून चेंजिंग रुमच्या दिशेने परतला.

मयंक अग्रवालने आतापर्यंत १६ कसोटी सामन्यांमध्ये ४३.३० च्या सरासरीने १ हजार ४२९ धावा केल्या. या दरम्यान मयंकने ४ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत.


हेही वाचा – रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्फराज खानची तुफानी खेळी; पाच इनिंगमध्ये केल्या ७०४ धावा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -