‘या’ गोलंदाजाची अॅक्शन पाहून होईल लगान चित्रपटाची आठवण; व्हिडीओ व्हायरल

अनेकदा गोलंदाज (Bawler) वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करत असतात. काहींची धावण्याची पद्दत वेगळी असते तर, काहींची धावल्यावर चेंडू टाकण्याची पद्धत वेगळी असते.

अनेकदा गोलंदाज (Bawler) वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करत असतात. काहींची धावण्याची पद्दत वेगळी असते तर, काहींची धावल्यावर चेंडू टाकण्याची पद्धत वेगळी असते. अशाच एका स्थानिक खेळाडूंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होते आहे. गोलंदाजाची ही बॉलिंग ऍक्शन बघून अनेकांना लगान चित्रपटाची आठवण झाली. लगानमध्ये (Lagan) गोली नावाचं कॅरेक्टरही अशाच प्रकारे रन अप पासूनच हात हलवत बॉलिंग करतो.

या व्हिडीओतील गोलंदाजाची चेडू टाकण्याची पद्धत पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ट्विटरवर एका यूजरने या गोलंदाजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा गोलंदाज रनअप (धावत) पासूनच हात हलवायला सुरूवात करतो आणि क्रीजपर्यंत आल्यानंतर चेंडू टाकतो. हा व्हिडीओ शेअर करत युजरने ‘मलिंगा, बुमराह पथिरानाला विसरून जा, ही सगळ्यात बेस्ट बॉलिंग ऍक्शन आहे’, असं कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा – 6,6,6,6,6,6,… ‘या’ खेळाडूने एकाच षटकात ठोकले सहा षटकार; व्हिडीओ पाहून होईल युवराज सिंहची आठवण

हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, की इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही शेअर केला. ही प्रॉपर ऍक्शन आहे, असे म्हणत वॉनने हा व्हिडिओ रिट्विट केला. आयपीएल 2022 मध्ये सीएसकेकडून खेळलेला मथिशा पथिराना याची बॉलिंग ऍक्शन मलिंगासारखीच आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर पॉल ऍडम्स त्याच्या बॉलिंग ऍक्शनमुळे चर्चेत आला होता.


हेही वाचा – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मिताली राजची निवृत्ती