घरक्रीडाचेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे उद्घाटन, पाकिस्तानची माघार

चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे उद्घाटन, पाकिस्तानची माघार

Subscribe

चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडला आजपासून चेन्नईमध्ये सुरुवात झाली आहे. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत या सोहळ्याला उपस्थित होते. स्टॅलिन यांनी पंतप्रधानांचे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. ज्येष्ठ बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल पंतप्रधानांना सुपूर्द केली.

उद्घाटनाच्या काही वेळापूर्वीच पाकिस्तानने या स्पर्धेत खेळणार नसल्याचे सांगत मोठा निर्णय घेतला. त्यांचे खेळाडू चेन्नईला पोहोचले होते. मात्र, पाकिस्तानने माघार घेतल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

तामिळनाडूने अनेक बुद्धिबळ मास्टर्स तयार केले

तामिळनाडूमध्ये विविध खेळांचे प्रतिनिधित्व करणारी सुंदर शिल्पे असलेली अनेक मंदिरे आहेत. तामिळनाडूचा बुद्धिबळाशी खोल आणि ऐतिहासिक असा संबंध आहे. या राज्याने अनेक बुद्धिबळपटू, मास्टर्स तयार केले आहेत. येथे एक जिवंत संस्कृती आणि सर्वात जुनी भाषा तमिळ आहे.

- Advertisement -

चेन्नई, तामिळनाडू येथील ईस्ट कोस्ट रोडवर असलेल्या शेरेटन महाबलीपुरम रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे सामने खेळवले जाणार आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी बुद्धिबळातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या रशिया आणि चीनच्या अनुपस्थितीत खुल्या आणि महिला विभागांत भारताचे प्रत्येकी तीन संघ पदकाच्या ईर्षेने सज्ज झाले आहेत.

पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यंदा ऑलिम्पियाडमध्ये खेळणार नसून प्रेरकाच्या भूमिकेत असणार आहेत. तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या अमेरिका, मॅग्नस कार्लसनच्या नेतृत्वाखालील नॉर्वे आणि अझरबैजानचे प्रमुख आव्हान भारतापुढे असणार आहे.

भारतातील खेळ अधिक मजबूत होताहेत

भारत ही अशी भूमी आहे, जिथे बुद्धिबळाचा उगम झाला. अगदी महिन्याभरापूर्वी आम्ही दिल्लीत प्रथमच मशाल रिले साजरा केला. आजपासून बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारतातील खेळ दिवसागणिक मजबूत होत आहेत, असं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.


हेही वाचा : डोपिंगमध्ये ‘उत्तेजन’ : जागतिक क्रमवारीत भारताचे लाजीरवाणे स्थान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -