घरक्रीडाDC vs KKR : आयपीएलच्या 17 व्या पर्वात दुसऱ्यांदा सर्वाधिक धावांचा विक्रम;...

DC vs KKR : आयपीएलच्या 17 व्या पर्वात दुसऱ्यांदा सर्वाधिक धावांचा विक्रम; कोलकाताचे 272 धावांचे दिल्लीला आव्हान

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वात सातत्याने विक्रमांची नोंद होताना पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने 277 धावा करत यंदाच्या आयीपएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात कोलकाताने 272 धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले आहे.

विशाखापट्टणम : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वात सातत्याने विक्रमांची नोंद होताना पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने 277 धावा करत यंदाच्या आयीपएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात कोलकाताने 272 धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले आहे. 272 धावसंख्येमुळे कोलकाता सर्वाधिक धावांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. (DC vs KKRSecond Highest Run Record in Season 17 of IPL Kolkata 272-run challenge to Delhi)

आयपीएलच्या 17 व्या पर्वातील 16 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. विशाखापट्टणम येथे हा सामना सुरू असून या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 7 गडी गमावून 272 धावा केल्या. कोलकाताचा सलामीवीर सुनील नरीन याने 85 धावांची तुफानी खेळी केली. त्यावेळी अंगकृश रघुवंशीने 27 चेंडूत 54 धावा केल्या. तसेच, आंद्रे रसेल याने 19 चेंडूत 41 धावा केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Michael Vaughan : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन मुंबईत खेळतोय गल्ली क्रिकेट; व्हिडीओ व्हायरल

कोलकाताने केलेली 272 धावसंख्या ही आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी लामीवर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि त्यानंतर हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. हैदराबादने आपल्या डावात एकूण 18 षटकारांची बरसात केली आणि मुंबईला 278 धावांचे आव्हान दिले होते.

- Advertisement -

दरम्यान, दिल्लीने मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत या पर्वातील पहिला विजय मिळवला. पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार ऋषभ पंत यांची फलंदाजी CSK विरुद्ध जोरदार चालली. त्याचबरोबर खलील अहमदने गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये संघाने विजया मिळवला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघ : फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

दिल्ली कॅपिटल्स संघ : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, रशीक दार सलाम, एनरिक नोर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद.


हेही वाचा – SRH VS MI : हैदराबादने रचला धावांचा डोंगर, आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -