घरक्रीडाIND vs SL : भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, मिस्ट्री स्पिनर...

IND vs SL : भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, मिस्ट्री स्पिनर संघाबाहेर

Subscribe

भारत विरुद्ध श्रीलंकामध्ये टी-२० मालिका गुरुवारी सुरु होणार आहे. पहिला सामना लखनऊच्या इकाना मैदानात होणार आहे. यापूर्वीच श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर वानिन्दु हसरंगा टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. हसरंगा अद्याप ऑस्ट्रेलियामधून परतला नाही.

श्रीलंकेचा संघ या महिन्यात पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या मालिकेदरम्यान हसरंगा कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. यामुळेच ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यात हसरंगा खेळू शकला नाही. हसरंगाला आइसोलेट करण्यात आले होते. श्रीलंका संघातील बाकीचे खेळाडू परतले आहेत परंतु हसरंगा अद्याप मेलबर्नमधून परतला नाही. ऑस्ट्रेलियावरुन निघण्यासाठी हसरंगाचा कोरोना अहवाल नकारात्मक येणे गरजेचे आहे. परंतु हसरंगाचा मंगळवारी कोरोना अहवाल पुन्हा सकारात्मक आला आहे. हसरंगाला १५ फेब्रुवारीला कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

हसरंगा संघात नसल्याने हा श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मागील २०२१ मध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये सामना झाला होता. तेव्हा हसरंगाने २-१ च्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच त्याला प्लेयर ऑफ द सीरीजने गौरवण्यात आले होते. त्याने ३ सामन्यांमध्ये ७ विकेट घेतले होते. हसरंगाला यंदा आयपीएल ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने १०.७५ करोड रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले आहे.

श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर असून तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला टी-२० सामना लखनऊमध्ये २४ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. यानंतर धर्मशाळामध्ये २६ फेब्रुवारी २७ फेब्रुवारीला टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. टेस्ट सीरीजची सुरुवात मोहालीमध्ये होणार आहे. पहिला सामना ४ मार्चे ते ८ मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. यानंतर बंगळूरुमध्ये दुसरा आणि अंतिम टेस्ट सामना १२ ते १६ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीलंकेचा संघ

दासुन शनाका (कर्णधार) पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, दिनेश चांदीमल, दनुष्का गुणाथिलाका, कामिल मिशारा, जनीथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरु कुमारा, बिनुरा फर्नांडो, माहीश फर्नांडो थीक्षाना, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, आशियाना डेनियल


हेही वाचा : IND vs SL: टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दीपक चाहरनंतर सूर्यकुमार यादवही संघातून बाहेर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -