घरक्रीडाइंग्लंडचा पराभव करत भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल

इंग्लंडचा पराभव करत भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल

Subscribe

राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून भारतीय खेळाडून जबरदस्त कामगिरी करत आहेत. नुकताच भारताच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. उपांत्य फेरीत भारताने चार धावांनी विजय मिळवला आहे.

बर्मिंगहम : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून भारतीय खेळाडून जबरदस्त कामगिरी करत आहेत. नुकताच भारताच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. उपांत्य फेरीत भारताने चार धावांनी विजय मिळवला आहे. (India women team beat England womens team and enters the finals of CWG 2022)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 165 धावांचे लक्ष्य इंग्लंड समोर ठेवले होते. या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंटच्या संघाला 160 धावा करता आल्या. त्यामुळे भारताने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्चस्व कायम ठेवले.

- Advertisement -

राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्याने भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ ‘सुवर्ण’ कामगिरी करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारतीय महिला संघाकडून सलामीवीर स्मृती मानधनाने दमदार फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना सुरूवातीपासून स्मृतीने इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. फलंदाजी करताना जोरदार फटकेबाजी केली. या सामन्यात स्मृतीने 32 चेंडूंत 8 चौकार आणि 3 षटकार मारत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली.

- Advertisement -

स्मृती मानधना बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या जेमिमा रॉड्रिगेझने धावांचा ओघ कायम ठेवला. जेमिमाने फलंदाजी करताना 31 चेंडूंत 7 चौकार मारत नाबाद 44 धावा केल्या. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 164 धावा करता आल्या.

भारताच्या 165 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही. भारताचे गोलंदाज स्नेह राणाने दोन गडी बाद केले. तसेच, दीप्ती शर्माने एक विकेट घेतली.


हेही वाचा – महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची स्टीपलचेस शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदक पटकावत मोडला ‘हा’ रेकॉर्ड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -