घरक्रीडाIPL 2022: युझवेंद्र चहलला बाल्कनीतून लटकवल्याप्रकरणी रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

IPL 2022: युझवेंद्र चहलला बाल्कनीतून लटकवल्याप्रकरणी रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Subscribe

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलला बाल्कनीतून लटकवल्याप्रकरणी आणि आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूवर आजीवन बंदी घालण्यात यावी, असं भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या एका सहकाऱ्याने त्याला मद्यधुंद अवस्थेत बाल्कनीतून लटकवले होते. यानंतर बाकीच्या खेळाडूंना याची माहिती मिळताच हे धावत आले. त्यानंतर त्यांनी त्याला वाचवले, असं चहल म्हणाला होता.

चहलने आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूचे नाव द्यावे, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. ज्या व्यक्तीने त्याच्यासोबत गैरवर्तन केले आहे. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहीजे. सेहवागनंतर शास्त्रींनी सुद्धा या घटनेला धोकादायक ठरवत दोषी असणाऱ्या खेळाडूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले शास्त्री ?

ही हास्यास्पद गोष्टी नाहीये. यामध्ये कोणाचा सहभाग होता हे मला माहिती नाही. परंतु ती व्यक्ती शुद्धीमध्ये नव्हती. जर असं असेल तर ही मोठी गोष्ट आहे. काही लोकांना ही हास्यासस्पद बाब वाटेल पण मला यावर हसू येत नाही. यावरून असे समजते की, जो कोणी हे करत आहे, तो अशा परिस्थितीत आहे. ज्याची परिस्थिती योग्य नाहीये. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता, तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते, असं रवी शास्त्री म्हणाले.

दोषींवर आजीवन बंदी

ही कोणत्याही प्रकारची हास्यास्पद बाब नाही. आजच्या काळात अशी घटना घडल्यास त्या व्यक्तीवर आजीवन बंदी घालण्यात यावी आणि त्याला लवकरात लवकर पुनर्वसन केंद्रात पाठवावे, असं रवी शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

चहलने काय सांगितलं?

२०१३ च्या सामन्यानंतर सर्व खेळाडूंना एकत्र येण्यासाठी बोलावण्यात आले होते. मला त्याचे नाव सांगायला आवडणार नाही, पण एक खेळाडू खूप दारू प्यायला होता. तो खूप नशेत होता. त्याने बराच वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग मला हाक मारली. त्याने मला बाहेर जाण्यास सांगितले आणि मला १५ व्या मजल्यावरच्या बाल्कनीत लटकवले, असं चहलने सांगितलं.

त्यावेळी मी पूर्णपणे घाबरले होतो. मी त्या खेळाडूला घट्ट पकडले. मी त्याचा गळा पकडून ठेवला होता. माझे हात सुटले असते तर मी पंधराव्या मजल्यावरून खाली पडलो असतो. मात्र, काही वेळातच बाकीचे लोक बाल्कनीत आले आणि मला मदत केली. मी खूप घाबरलो होतो आणि त्यानंतर मी बेहोश झालो. लोकांनी मला पाणी दिले, मग मी शुद्धीवर आलो, असं चहलने सांगितलं.


हेही वाचा : संपाचे अपयश लपविण्यासाठी हल्ल्याचे षडयंत्र; परिवहन मंत्री अनिल परब यांचा आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -