घरक्रीडाIPL 2022 Auction: श्रीसंतचे आयपीएल खेळण्याचं स्वप्न मोडलं, शॉर्टलिस्ट असूनही दुसऱ्यांदा धक्का

IPL 2022 Auction: श्रीसंतचे आयपीएल खेळण्याचं स्वप्न मोडलं, शॉर्टलिस्ट असूनही दुसऱ्यांदा धक्का

Subscribe

आयपीएलच्या १५ व्या हंगामातील मेगा लिलावात २०० हून अधिक खेळाडूंनी बोली लावली होती. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेला आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव पार पडला. लिलावात अनेक खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे जास्त पैसे मिळाले. मात्र टीम इंडियाच्या एका खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा गोलंदाज एस श्रीसंतचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येऊनही त्याचं नाव आयपीएलमध्ये घेण्यात आलेलं नाहीये. तसेच त्याच्यावर देखील कोणीही बोली लावलेली नाहीये.

टीम इंडियाकडून दोन विश्वकप जिंकणारा गोलंदाज श्रीसंतला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात संधी मिळाली नाही. या गोलंदाजाचे नाव आयपीएल लिलावात सहभागी होण्यासाठी तयार करण्यात आले होते आणि शेवटच्या ५९० खेळाडूंच्या यादीतही त्याचे नाव होते. तरीही लिलाव सभागृहात लिलावादरम्यान श्रीसंतचे नाव घेण्यात आले नाही. त्याचे नाव शॉर्टलिस्टमध्ये असूनही लिलावच्या प्रक्रियेत त्याचे नाव पोहचू शकले नाही.

- Advertisement -

स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव आल्यामुळे श्रीसंतवर बीसीसीआयने बंदी घातली होती. ७ वर्षांची बंदी घालण्यात आलेल्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आपले नाव दिले होते. बीसीसीआयने जाहीर केलेल्या शेवटच्या लिलाव प्रक्रियेत त्याची नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. आयपीएलमध्ये श्रीसंतने निराश होण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. कारण मागील वर्षातील आयपीएलच्या स्पर्धेतूनही त्याने आपले नाव लिलावासाठी ड्राफ्टमध्ये टाकले होते.

ज्या चाहत्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला त्यांचे खूप आभार. व्हॉईट बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी मी अजूनही उत्सुक आहे. ही फक्त सुरूवात होती. प्रत्येक वेळी माझ्याकडून सर्वोत्परी प्रयत्न करणे सोडणार नाही, असे ट्विट श्रीसंतने केले आहे.

- Advertisement -


हेही वाचा : IPL 2022 Mega Auction : आयपीएल लिलावात सुरेश रैना UNSOLD, चेन्नईच्या संघाचा आला मॅसेज


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -