Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Exchange Offer : जुन्या रेफ्रिजरेटर द्या, ५६ टक्के सवलत मिळवा

Exchange Offer : जुन्या रेफ्रिजरेटर द्या, ५६ टक्के सवलत मिळवा

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडची ग्राहकांसाठी ऑफर

Related Story

- Advertisement -

ऊर्जा संवर्धन व उर्जा क्षमतवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल), एमईआरसीच्या मार्गदर्शक तत्वांतर्गत ऊर्जा क्षमतेचा पंचातारांकित रेफ्रिजरेटर खरेदी कार्यक्रम घरगुती ग्राहकांसाठी पुन्हा सादर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, नवीन खरेदी किंवा जुना रेफ्रिजरेटर बदली करण्यावर एईएमएल ४७ ते ५६ टक्के सवलत देईल व जुना दोन दरवाज्याचा रेफ्रिजरेटर बदली केल्यास अतिरिक्त सवलत मिळेल. पंचातारांकित रेफ्रिजरेटरमुळे तो २४ तास सुरू ठेवल्यावरही ग्राहकांचे मासिक वीज बील कमी येईल.

एईएमएलने आतापर्यंत अशाप्रकारचे तीन कार्यक्रम याआधी सादर केले होते. त्याद्वारे ऊर्जा क्षमतेचे पंचतारांकित २५ हजार पंखे व ६५०० रेफ्रिजरेटर घरगुती ग्राहकांना अनुदानित किमतीवर विक्री केले होते. या कार्यक्रमाचा अधिकाधिक ग्राहकांना लाभ मिळावा यासाठी, एईएमएलने त्यांच्या घरगुती ग्राहकांसाठी २० हजार रेफ्रिजरेटर उपलब्ध केले आहेत. याअंतर्गत नोंदणीसाठी ग्राहक www.adanielectricity.com संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा १९१२२ या क्रमांकावर कॉल करु शकतात.

- Advertisement -

घरगुती ग्राहकांसाठी पंचतारांकित रेफ्रिजरेटरचा कार्यक्रम पुन्हा सादर करताना एईएमएलचे प्रवक्ते म्हणाले की, ‘ऊर्जा क्षमतेचे पंचातारांकित रेफ्रिजरेटर हे महाग असतात. त्यामुळेच एईएमएलने ऊर्जा संवर्धनाला प्रोत्साहित करण्याच्या हेतूने सवलत देत किमतीतील दरी भरुन काढत ग्राहकांना ऊर्जा क्षमतेची उपकरणे खरेदी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ऊर्जा क्षमतेच्या उपकरणांचा वापर केल्याने ऊर्जा बचतीखेरीज ग्राहक कमी कार्बन उत्सर्जन हवेत सोडण्यासाठीही योगदान देतात.

कसा बुक कराल रेफ्रिजेरेटर ?

एईएमएलच्या ज्या घरगुती ग्राहकांना पंचतारांकित रेफ्रिजरेटर खरेदी करायचा आहे, त्यांना स्वत:ची नोंदणी ‘१९१२२’ या २४x७ टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन करावी लागेल किंवा एईएमएल च्या www.adanielectricity.com या संकेतस्थळालादेखील भेट देता येईल. त्यांना नोंदणीच्यावेळी नाव, एईएमएल ग्राहक खाते क्रमांक व संपर्क, अशी माहिती देणे अनिवार्य आहे. या कार्यक्रमासाठी एईएमएलने गोदरेज अप्लायन्सेससह भागीदारी केली आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना १९२ लिटरचा एकल दरवाजा असलेला रेफ्रिजरेटर खरेदी करता येईल. या रेफ्रिजरेटरची मूळ किंमत २३ हजार ५०० ते २५ हजार ५०० रुपयांदरम्यान आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्राहक हा रेफ्रिजरेटर १२ हजार ३०० ते १३ हजार ८०० रुपयांत खरेदी करु शकतात. नवीन किंवा जुन्या रेफ्रिजरेटरच्या बदल्यातील खरेदी किंवा दुहेरी दरवाजा असलेला रेफ्रिजरेटर, यापैकी ग्राहक जे निवडीतील त्यानुसार त्यांना ऑफर मिळेल. रेफ्रिजरेटरचे मॉडेल हे उपलब्धतेनुसार असेल तसेच किंमतदेखील बदलू शकते, हे ध्यानात ठेवावे.


- Advertisement -

 

- Advertisement -