घरटेक-वेकसॅमसंगचा नवा स्मार्टफोन लाँच

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन लाँच

Subscribe

सॅमसंगने गॅलेक्सी एस लाईट लक्झरी हा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. एस लाइट हा एस ८चं मिनी व्हर्जन आहे. चीनमधील एका वेबसाइटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस लाइट हा चीनमधील गऊ.लो या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत ३९९९ युआन म्हणजेच जवळपास ४०,००० रुपयांचा हा स्मार्टफोन असेल.

गॅलेक्सी ड लाइट लक्झरी स्मार्टफोनचे खास फीचर्स –
ड्युल सिमकार्ड असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड ८.० ओरिओ ओएसवर आधारित आहे. यामध्ये ५.८ इंच स्क्रिन असून यांचं रेझ्युलेशन १०८०x२२२० पिक्सल आहे. यामध्ये २.२ ॠकू कोअर स्नॅपड्रगन ६६० प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच वायफाय, जीपीएस, तसंच ३००० एमएचची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंग देखील देण्यात आलं आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -