घरट्रेंडिंग'या' कारणामुळे नेहा धुपियाने केली लग्नाची घाई ?

‘या’ कारणामुळे नेहा धुपियाने केली लग्नाची घाई ?

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया नुकतीच लग्नाच्या बंधनात अडकली आहे. कोणताही गाजावाजा न करता, लग्न झाल्यानंतरच नेहाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जाहीर केले. नेहाने घाईत लग्न करण्याचे आणखी एक कारण चर्चीले जात आहे. नेहा धुपिया गर्भवती असल्यामुळे तिने दोन वर्षांनी लहान असलेल्या अंगद बेदीसोबत लगीनगाठ बांधली, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे नेहाकडे डबल गुड न्यूज असणार आहे.

चर्चा किती खरी किंवा खोटी हे तर नेहा आणि अंगदच सांगू शकतील. मात्र लग्नापूर्वी गरोदर राहणाऱ्या अनेक अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीत आहेत. अशाच काही बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्रींचा आढावा…

- Advertisement -
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिने निर्माता बोनी कपूरसोबत लग्न केले. त्यावेळी श्रीदेवी गरोदर होती. पहिली मुलगी जान्हवीच्या जन्मापूर्वी श्रीदेवीने बोनीसोबत लग्नगाठ बांधली.

सारिका आणि कमल हसन

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार कमल हसन आणि अभिनेत्री सारिका यांनी लग्नापूर्वी एकत्र राहत असताना श्रुती हसनचा जन्म झाला. तर, त्यांची दुसरी मुलगी अक्षराचा जन्म दोघांच्या लग्नानंतर झाला.

- Advertisement -
अभिनेत्री महिमा चौधरी

किंग खान शाहरुखसह बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री महिमा चौधरीनेही गरोदरपणानंतर लग्नगाठ बांधली होती.

अभिनेत्री रिया सेन

ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेनची नात आणि मूनमून सेनची मुलगी रिया हिच्या लग्नाची घाईदेखील तिच्या गरोदरपणामुळेच करण्यात आली होती.

अभिनेत्री सेलिना जेटली

अभिनेत्री सेलिना जेटलीने गरोदर राहिल्यानंतर अॉस्ट्रियन बॉयफ्रेन्ड पिटरसह लग्नगाठ बांधली होती. सेलिनाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता.

 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -