घर टेक-वेक Royal Enfield Bullet खरेदी करा अवघ्या ४० हजारांमध्ये, पहा ऑफर !

Royal Enfield Bullet खरेदी करा अवघ्या ४० हजारांमध्ये, पहा ऑफर !

Subscribe

ही डील तुम्हाला अगदी कमी किंमतीत देतेय बुलेट

रॉयल इनफिल्ड बुलेट चालवणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. भारतीय तरुणाईमध्ये तर  रॉयल एनफील्डची सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळे भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये रॉलय इनफिल्डची पसंती आजही कामय आहे. परंतु साऱ्यांना आकर्षित करणारी ही बाईक किंमत जास्त असल्यामुळे बरेच लोक विकत घेऊ शकत नाहीत. परंतु भारतात असेही बुलेटप्रेमी आहेत जे पेट्रोलचे भाव वाढू या महागाई परंतु बुलेट घेणार म्हणजे घेणारचं असे ठरवूनचं राहतात. अशाच बुलेटचा छंद असणाऱ्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. कारण Royal Enfield Bullet अवघ्या ४० हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे.

तरुण वर्गात ही बाईकची क्रेझ यासाठी आहे कारण या बुलेटचा दमदार लुक आणि भारदस्त आवाज. रॉयल एनफील्ड बाइक्सचे पहिले बेस मॉडेल १ लाख २९ हजार पासून सुरू होतो. त्यामुळे अनेकदा खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा महागड्या किंमतीमुळे तरुणाईची इच्छा ही इच्छाच बनून राहते. जर तुमचेही बुलेट खरेदी करण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी जबरदस्त पर्याय घेऊन आलो आहोत. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी ४० हजारात ही बुलेट खरेदी करत घरी घेऊन जाऊ शकता. अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत आपण सेंकड हँड बुलेट कशी आणि कुठे खरेदी करु शकता हे बातमीद्वारे सांगत आहे.

- Advertisement -

भारतात सेकेंड हँड बाईक खरेदी- विक्रीचे मोठी ऑनलाईन बाजारपेठ आहे. त्यामुळे अशा अनेक ऑनलाईन वेबसाईट्स आहेत ज्या अगदी कमी किंमतीत बुलेट आपल्या दारात आणून देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला बाईक शोरुममध्येही जाण्याची गरज नाही. अशीच एक ऑफर आज सेकेंड हँड सामान खरेदी विक्री करणाऱ्या OLX ने सुरु केली आहे. OLX ने आपल्या वेबसाईटवर बाईक सेक्शनमध्ये सेलमध्येही बुलेट विक्रीसाठी काढली आहे. यात Royal Enfield Bullet Electra 350 सीसी असणारी बाईकची अवघे ४२ हजार रुपये विक्री किंमत ठेवली आहे.

जाणून घेऊ या बुलेटची डिटेल ? कशी तुम्ही खरेदी करु शकता ?

OLX वेबसाइटवरील लिस्टमध्ये रॉयल एनफील्ड Royal Enfield Bullet Electra 350 हे मॉडेल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. ही बुलेटची ओनरशिप फस्ट पार्टी असून ही आतापर्यंत 45000 किमी चालवली आहे. ही बुलेट उत्तर प्रदेशच्या UP11 आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. हे साइटवर जीतू नावाच्या वापरकर्त्याने ही बुलेट लिस्ट केली असून तो दिल्लीच्या प्रताप विहार परिसरात राहणार आहे. या विक्रेत्याने या बुलेटची किंमत अवघी ४२ हजार रुपये ठेवली आहे, परंतु जर तुम्हाला ती विकत घ्यायची असेल तर तुम्ही त्या विक्रेत्याशी थेट बोलून कमीतकमी ५ हजार रुपयांनी कमी करू खरेदी करु शकता.

- Advertisement -

महत्वाची माहितीः कोणतीही सेकंड हँड बाइक खरेदी करण्यापूर्वी तिचे कागदपत्रे व त्याची कंडीशन योग्यप्रकारे तपासून घ्या. अन्यथा भविष्यात तोटा होऊ शकतो.


 

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -