घरटेक-वेकफोनवर बोलताना कमी आवाज येतो? मग 'या' ट्रीक्स वापरा

फोनवर बोलताना कमी आवाज येतो? मग ‘या’ ट्रीक्स वापरा

Subscribe

बरेचदा आपल्या हातून आपल्या नकळत फोनमधील काही सेटिंग्ज चेंज होऊन जातात. ज्यामुळे आवाज कमी ऐकू येणे किंवा ऐकूच न येणे अशा समस्या उद्भवतात.

बरेचदा आपण फोनवर बोलत असताना समोरच्या व्यक्तीचा आवाज खूप कमी ऐकू येतो. त्यामुळे साहाजिकच आपण आपल्या फोनच्या व्हॉल्युम वाढवतो किंवा प्रसंगी फुल करतो. इतकंच नाही तर आपल्याशी बोलत असलेल्या व्यक्तीला त्याच्या फोनच्या स्पीकरचा आवाज वाढवण्याचा सल्ला देतो. मात्र, हे सगळे उपाय करुनही आपल्याला दुसऱ्या बाजूने बोलणाऱ्याचा आवाज कमीच ऐकू येतो. ज्यामुळे अनेकदा संभाषणामध्ये अडचण निर्माण होते. जवळपास प्रत्येकचजण या समस्येला हमखास सामोरा जात असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रीक्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा आवाज अगदी नवीन फोनसारखा स्पष्ट ऐकू येईल. बरेचदा आपल्या हातून आपल्या नकळत फोनमधील काही सेटिंग्ज चेंज होऊन जातात. ज्यामुळे आवाज कमी ऐकू येणे किंवा ऐकूच न येणे अशा समस्या उद्भवतात. मात्र, या काही छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर अशा प्रॉब्लेम्सपासून आपण त्वरित सुटकारा मिळवू शकतो. जाणून घेऊया, अशाच काही साध्यासोप्या टीप्स….

Volume अॅडजेसमेंट

एखाद्याला फोन करण्याआधी तुमच्या फोनची व्हॉल्यूम सिस्टीम बरोबर आहे का ते चेक करा. बरेचदा घाईगडबडीत आपण मिडीया व्हॉल्युमच्या जागी कॉल व्हॉल्युम कमी करतो. त्यामुळे साईड कीजचा वापर करुन सर्वप्रथम तुमचा कॉलिंग व्हॉल्युम व्यवस्थित आहे ना हे तपासा. सोबतच फोनवर बोलतेवेळी देखील आपण कॉलिंग व्हॉल्युम वाढवायला जातो पण त्याजागी मीडिया व्हॉल्यूम किंवा ‘अलार्म’ व्हॉल्युम वाढत जातो. त्यामुळे कॉलिंग व्हॉल्युम वाढूवनही तो वाढत नाही याचा अर्थ आपल्या फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असा आपला गैरसमज होतो. त्यामुळे या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या.

- Advertisement -


ईयरफोन्स आणि स्पीकर स्वच्छ ठेवा

अनेकजण फोन कानाला लावून बोलण्याऐवजी ईयरफोन्स कानात घालून बोलणं पसंत करतात. गर्दीच्या ठिकाणी असताना किंवा हातात सामान असल्यास त्याचा फायदाही होतो. मात्र, तुमचे इयरफोन्स खराब असतील तर समोरच्याचा आवाज स्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमचे इयरफोन्स वारंवार स्वच्छ करा. इयरफोन्समध्ये पाणी गेलं आहे का, इयरबर्ड्स खराब झाले आहेत का, त्यामध्ये फंगस किंवा मॉयश्चर जमलं आहे का? हे वेळोवेळी चेक करा. फोनच्या स्पीकर आणि माईकबाबतही या गोष्टी लागू होतात.

- Advertisement -


नेटवर्क मोड बदलणे

अनेकदा तांत्रिक आणि नेटवर्कच्या प्रॉब्लेम्समुळेही समोरच्या माणसाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाही. हा प्रॉब्लेम टाळण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या नेटवर्क मोडला ‘ऑटोमॅटिक’ वरुन ‘मॅन्युअल’ वर शिफ्ट करा. मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन मोबाईल एंड डेटा सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जा. त्यानंतर सिम सिलेक्ट करुन नेटवर्कला ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशनवरुन हटवून मॅन्युअल सेटिंवर शिफ्ट करा. या सेटिंगनंतर तुम्हाला फोनमधून क्लिअर आवाज ऐकू येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -