घरठाणेमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरील सर्व्हिस रोडवर झाड कोसळले

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरील सर्व्हिस रोडवर झाड कोसळले

Subscribe

पडलेले झाडे कापून बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे. यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर हे झाड पडल्याचे दिसून आले. पण, गाडीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत आहेत.

मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील लुईसवाडी येथील शुभ दीप बंगल्याबाहेरील सर्व्हिस रोडजवळ झाड कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पडलेले झाडे कापून बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे. यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर हे झाड पडल्याचे दिसून आले. पण, गाडीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत आहेत. (A tree fell on the service road outside the Chief Minister’s bungalow)

हेही वाचा – विक्रोळीत पंचशील नगर येथे घरांवर कोसळली दरड, बचावकार्य सुरू

- Advertisement -

मंगळवारी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी सर्व्हिस रोडच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे खोदकामही करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील झाडांची मुळे देखील बाहेर आली होती. त्यात सोमवारपासून पावसाळा सुरु झाल्याने झाडांची आजूबाजूची जमीन देखील भुसभुशीत झाली होती. त्यामुळेच हे झाड कोसळले असावे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा – मुसळधार पावसाचा फटका; कल्याणमध्ये दरड कोसळली, घरे पाण्याखाली

- Advertisement -

दरम्यान, हे झाड बाजूला असलेल्या विद्युत पोलवर पडल्याने पोल देखील खाली वाकला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. परंतु हे झाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या गाडीवर काही प्रमाणात पडल्याचे दिसून आले. परंतु पोल मध्ये असल्याने गाडीचे फारसे नुकसान झाले नाही. विशेष म्हणजे शिंदे यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी रात्री ते प्रथमच ठाण्यात आले आहेत. मंगळवारी ते आपल्या निवास्थानी होते. यावेळी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस ही घटना घडली आहे. घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने हे झाड बाजूला काढले आहे. झाड हटविण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा कालावधी गेल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -