घरठाणेKalyan Crime: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला गुन्हेगार बनवलं; भाजपा आमदार गायकवाडांचा...

Kalyan Crime: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला गुन्हेगार बनवलं; भाजपा आमदार गायकवाडांचा गंभीर आरोप

Subscribe

भाजपाचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेनशमध्येच अंदाधुंद गोळीबार केला आहे.

उल्हासनगर: भाजपाचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेनशमध्येच अंदाधुंद गोळीबार केला आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ठाणे शहरातील ज्युपीटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

हा गोळीबार झाल्यानंतर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनीच “झी चोवीस तास” या वृत्तवाहिनीशी बोलताना कबुली दिली आहे. मीच गोळीबार केल्याचं त्यांनी कबुल केलं. इतकचं नाही तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट लक्ष्य केलं आहे. (Kalyan Crime Yes I did the firing on Mahesh Gaikwad Confession of MLA Ganpat Gaikwad said Eknath Shinde made me a criminal)

- Advertisement -

काय म्हणाले गणपत गायकवाड?

भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले की, या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांनी हिंमत करून मला अडवले. मात्र त्यांना जिवे मारण्याचा हेतू नव्हता. पण पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं, असं गणपत गायकवाड यांनी सांगितले.

तसंच, गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार गुन्हेगार बनवलं आहे. असा आरोपही त्यांनी केला. तसेच, मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असंही आमदार गायकवाड म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Transgender teachers : ट्रान्सजेंडर शिक्षिकेची शाळेतून हकालपट्टी, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला विचारला जाब )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -