घरठाणेठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन

ठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन

Subscribe

ठाणे: रामदास कदम यांनी केलेल्या गलिच्छ आणि अशलाघ्य वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात संतप्त शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचे जोडो मारून त्यानंतर त्या पुतळ्याचे मंगळवारी ठाण्यातील चिंतामणी चौकात दहन केले. यावेळी त्यांच्याविरोधात घोषणा बाजी करत, त्यांना यापुढे महाराष्ट्रात फिरून देणार नाही, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला.

ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली रामदास कदम यांना ठाण्यात शिवसैनिकांकडून हे निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी, रामदास कदम मुर्दाबाद, ५० खोके, निम का पत्ता कडवा है, रामदास कदम… येवढी माणसे कश्यासाठी…, अशी घोषणा बाजी करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी माजी नगरसेवक मधूकर देशमुख, संजय तरे, चिंतामणी कारखाणीस, महिला शिवसैनिकांचा मोठया प्रमाणात सहभागी झाल्या होता. यावेळी बोलताना खासदार विचारे यांनी कदम यांनी रामदास या नावालाही कलंक लावला आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असेही म्हणाले. तर केदार दिघे यांनी कदमांना आपला पराभव दिसू लागला आहे. त्यांचे फिरलेले डोके त्यांनी वेळीच जागेवर आणले नाहीतर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही दिला.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. यावेळी शिंदे गट आणि शिवसेना गट अशा दोन्ही बाजूंनी परस्पर टीका करताना सभ्यतेची पातळी ओलांडली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पातळी ओलांडली. दापोलीतील एका कार्यक्रमात रामदास कदम यांनी वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेच कॅबिनेट मंत्री व्हायचे होते. रश्मी ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, याचेच मला आश्चर्य वाटते, असा खोचक टोला रामदास कदम यांनी लगावला. उद्धव ठाकरे हे सतत ‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे’ असे सांगत असतात. ही गोष्ट त्यांनी किती वेळा सांगावी. आम्ही कधी नाही म्हटलंय का? बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असण्याबद्दल तुम्हाला संशय आहे का, असे आक्षेपार्ह वक्तव्यही त्यांनी केले.


ना शिवाजी पार्क, ना बीकेसी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को संकुलात?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -