घरठाणेसंजय राऊतांच्या आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिलं 'हे' उत्तर...; वाचा काय म्हणाले?

संजय राऊतांच्या आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिलं ‘हे’ उत्तर…; वाचा काय म्हणाले?

Subscribe

संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकारपरिषदा घेऊन नवीन वक्तव्य करताना दिसत आहेत. यावर आता श्रीकांत शिंदेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

एकीकडे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि ठाकरे गटामधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर नावाच्या गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. यावर आता श्रीकांत शिंदेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. “मला संजय राऊत यांची फार काळजी वाटते आणि सहानुभूती सुद्धा वाटते” असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय.

शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या हत्येचा कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हत्येसाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत राऊतांनी जे आरोप केलेत त्याचीही चौकशी करत ही स्टंटबाजी आहे का हे ही तपासले जाईल, असे शिंदे म्हणाले. त्यापाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलीय.

- Advertisement -

श्रीकांत शिंदे हे अंबरनाथमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, संजय राऊत हे सध्या आभासी जगात राहत असतात, त्यांना सध्या उपचाराची फार गरज आहे, म्हणून मला त्यांची फार काळजी वाटते आणि सहानुभूती सुद्धा वाटते. कारण संजय राऊत आणि त्यांच्या दररोजच्या सकाळच्या मनोरंजनाची महाराष्ट्राला गरज आहे.” असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी संजय राऊतांच्या आरोपांवर प्रत्तुत्तर दिलंय.

संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकारपरिषदा घेऊन नवीन वक्तव्य करताना दिसत आहेत. प्रत्येक दिवशी नव नवे आरोप करत संजय राऊत हे शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करत असतात. नुकतंच त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नवीन आरोप केलाय. पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात येऊन दमदाटी केली. मी नसताना कर्मचाऱ्यांना धमकावले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांच्या आरोपांना जे उत्तर दिलंय, त्यानंतर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -