Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग ८५ वर्षांच्या आजीबाईंचा ३९ वर्षाच्या बॉयफ्रेंडबरोबर BreakUp; नव्या BF च्या शोधात!

८५ वर्षांच्या आजीबाईंचा ३९ वर्षाच्या बॉयफ्रेंडबरोबर BreakUp; नव्या BF च्या शोधात!

Related Story

- Advertisement -

प्रत्येक माणसाला जगण्यासाठी कोणाची न कोणाची गरज भासते. जोडीदार असणं आणि एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना आधार देण्यासाठी एकत्र उभे राहण्यासाठी तसेच जीवनाचा प्रवास सुकर करण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा जोडीदार हवा असतो. याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असले तरी मात्र हे खरं आहे. काही लोकं एकट्याने आयुष्य घालवत आहेत, तर काही लोकं जीवनाच्या प्रवासात सुंदर लोकांसह आपले जीवन घालवत आहेत. अमेरिकेत राहणारी ८५ वर्षांची वयोवृद्ध महिला सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण ती वयाच्या ८५ वर्षी नव्या बॉय फ्रेंडच्या शोधात असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hattitudes (@hattitudes1)

- Advertisement -

या महिलेचे नाव हैट्टी रेट्रोगे (Hatti) असे असून ती न्यूयॉर्कमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच तिचा ३९ वर्षीय प्रियकरबरोबर ब्रेकअप झाला. हॅटी आता नवीन जोडीदार शोधत आहे. हा जोडीदार शोधण्यासाठी ती डेटिंग अ‍ॅपवर अकाउंट तयार करण्याचा देखील विचार करत आहे. हैट्टी ४८ वर्षांची असताना तिचा घटस्फोट झाला. फॅब्यूलस नावाच्या वेबसाइटला मुलाखत देताना ती म्हणाली, ‘मी सध्या कोणालाही डेट करत नाही. मी याबद्दल मी लवकरच पोस्ट करेन कारण मी काही पुरुषांना भेटले आहेत. आता मी पुन्हा डेटिंग करण्यास सुरूवात करणार आहे जेणेकरून मी पुन्हा एकदा प्रेमाचा आनंद घेऊ शकेन, असे तिने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hattitudes (@hattitudes1)

- Advertisement -

या महिलेने नवा प्रियकर मिळावा तसेत डेटिंगसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देखील केली होती. या जाहिरातीमध्ये तिने सांगितले की, तिला ३५ वर्षांपर्यंतच्या पुरुषांना डेट करायचे आहे. यानंतर तिला लग्नासाठी, रिलेशनशीपसाठी बर्‍याच जणांकडून विचारणाही करण्यात आली. ती तिची फोटो इंस्टावर शेअर करते असते. लोकही तिच्या फॅशन सेन्सचे चाहते आहेत. १७ हजार लोक या महिलेला फॉलो करताना दिसताय.

- Advertisement -