आनंद महिंद्रांचे सोशल डिस्टेंसिंगवर गमतीशीर ट्वीट, तुम्हीही पाहून हसाल

anand mahindra sadened by the protest og aganipath offers jobs to agniveer after service

देशात कोरोना विषाणूचे संकट दिवसागणिक वाढत असल्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या विषाणूपासून वाचण्यासाठी सरकारसह सर्वच स्तरातून सतत मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टेंसिंग नियमांचे पालन करा असे आवाहन केले जात आहे. परंतु या नियमांना घेऊन सोशल मीडियावर मजेशीर आणि गमतीदार मिम्स, मेसेज, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक गमतीशीर फोटो महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांनी सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचे आवाहन केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन बाईकस्वार शिडी घेऊन जात आहे. या दोघांचाही वेगवेगळ्या बाईकवर बसत गळ्यात शिडी अडकवून घेतली असून ती शिडी गळ्यात अडकवूनच बाईक चालवत असल्याचे दिसत आहेत. हा मजेशीर फोटो पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. या फोटोवर आत्ता युझर्स भन्नाट भन्नाट कमेंट्स करत आहेत. आनंद महिंद्रांनी हा फोटो शेअर करत लिहिले की, या कोरोना काळातही माझ्या चेहऱ्यावर काही क्षण हसू आले. परंतु अशाप्रकारे सोशल डिस्टेंसिग नियम पाळण्याची पद्धती सुरक्षेऐवजी अधिक धोकादायक ठरु शकते.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला फोटो काही दिवसांपूर्वीचा असला तरी सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत या फोटोवर ४ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असण्याबरोबरच सोशल वर्कमध्येही पुढे आहेत. दरम्यान भारतात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने आनंद महिंद्रा यांनी दिल्ली, मुंबई, पुण्यासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा त्वरीत व्हावा यासाठी Oxygen On Wheels उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमामार्फत गरजु रुग्णालये आणि रुग्णांना घरपोच मोफत ऑक्सिजन पुरवले जात आहे. महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअपच्या मदतीने दररोज ६०० हून अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स गरजूंपर्यंत पोहचवले जात आहेत.


Covid 19 : कोरोना काळात कॉमेडियन अली असगर डॉक्टर्स, मेडिकल स्टाफचे पोटभर हसवून करतोय मनोरंजन