घरट्रेंडिंगSarkari Naukri 2020: बँकेत १,४१७ पदांसाठी रिक्त जागा; जाणून घ्या, अर्जाची प्रक्रिया

Sarkari Naukri 2020: बँकेत १,४१७ पदांसाठी रिक्त जागा; जाणून घ्या, अर्जाची प्रक्रिया

Subscribe

इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने प्रोबेशनरी ऑफिसर तसेच मॅनेजमेंट ट्रेनीच्या १४१७ रिक्त पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजे २६ ऑगस्ट आहे. किमान २० वर्ष असणारा उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज ऑनलाईन मागवण्यात येत आहेत, तर अर्ज फीदेखील या पदांच्या श्रेणीनुसार निश्चित केली आहे, त्यासंबंधीचा माहिती खाली दिलेली आहे.

पद- प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी (PO/MT)
पदांची संख्या – १४१७
वेतनश्रेणी – १४,५०० रुपये – २५,७०० रुपये
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतून पदवीधर
वय मर्यादा – किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त ३० वर्षे

- Advertisement -

अर्जाचे शुल्क

जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गाला ८५० रुपये आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी वर्गाला १७५ रुपये जमा करावे लागणार आहेत. फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेटद्वारे देता येईल.

महत्त्वाचे…

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २६ ऑगस्ट २०२०
  • अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख – २६ ऑगस्ट २०२०
  • ऑनलाईन प्रारंभिक परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करण्याची तारीख – ऑक्टोबर २०२०
  • ऑनलाइन प्राथमिक परीक्षेची तारीख – ३, १० आणि ११ ऑक्टोबर २०२०
  • ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख – ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२०
  • ऑनलाईन मुख्य परीक्षेची तारीख – २८ नोव्हेंबर २०२०

अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयबीपीएस www.ibps.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी व दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. त्याचबरोबर निवडलेल्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.


Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची आज संधी; जाणून घ्या, ऑफर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -