घरट्रेंडिंग३१ जानेवारीपर्यंत FREE मिळणार LPG गॅस सिलेंडर! जाणून घ्या ऑफर

३१ जानेवारीपर्यंत FREE मिळणार LPG गॅस सिलेंडर! जाणून घ्या ऑफर

Subscribe

जाणून घ्या, Paytm कडून कॅशबॅक मिळवण्याची प्रक्रिया

एलपीडी सिलेंडर फ्रीमध्ये मिळवण्याची एक खास ऑफर सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. जर तुम्ही ३१ जानेवारी पूर्वी एलपीजी सिलेंडर बुक केला तर थेट मोफत सिलेंडर तुमच्यापर्यंत डिलिव्हर केला जाणार आहे. या ऑफरनुसार गॅस सिलेंडरसाठी तुम्ही बुक केल्यानंतर जी रक्कम लागेल ती परत केली जाणार आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, वॉलेट प्लेटफॉर्म Paytm ने ही ऑफर ग्राहकांना दिली असून या ऑफर अंतर्गत ग्राहकांना पेटीएमद्वारे एकदाच गॅस सिलिंडर बुक करता येणार आहे. विशेष म्हणजे ही ऑफर फक्त त्याच ग्राहकांना मिळेल जे पहिल्यांदाच Paytm द्वारे गॅस सिलिंडर बुक करणार आहेत. यासह पेटीएमची ही ऑफर सर्व कंपन्यांच्या गॅस कनेक्शनवर उपलब्ध असेल.

असा घ्या या ऑफरचा फायदा

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Paytm हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ‘recharge and pay bills’ या पर्य़ायावर क्लिक करून ‘book a cylinder’ पर्याय निवडावा लागणार आहे. जर तुम्ही Paytm च्या माध्यमातून सिलेंडर बुक केला तर तुम्हाला चांगलाच कॅशबॅक देखील मिळू शकेल. यामध्ये तुम्हाला ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. हा फायदा Paytm कडून पहिल्यांदाच गॅस सिलिंडर बुकिंगवर उपलब्ध असणार आहे.

- Advertisement -

ऑफर्स मिळवण्यासाठी या आहेत अटी

Paytm च्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमची बुकिंग रक्कम 500 रुपयांहून अधिक असायला हवी. ही ऑफर फक्त ३१ जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. ज्यावेळी तुम्ही सिलेंडर बुक करून पेमेंट कराल त्यानंतर एक स्क्रॅच कूपन तुम्हाला उपलब्ध होईल. हे कूपन बुकिंग केल्यानंतर २४ तासात उपलब्ध करण्यात येईल. हे कूपन तुम्हाला ७ दिवसांच्या आत स्क्रॅच केल्यानंतर तुमच्या खात्यात कॅशबॅक होईल.

Paytm कडून कॅशबॅक मिळवण्याची प्रक्रिया

  • Paytm डाऊनलोड केल्यानंतर‘recharge and pay bills’ या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर‘book a cylinder’ पर्याय निवडा
  • ‘book a cylinder’ क्लिक केल्यानंतर भारत, एचपी किंवा इंडेनमधून तुमच्या गॅसची कंपनी निवडा
  • नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा तुमचा एलपीजी आयडीची माहिती भरा
  • या प्रकियेनंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यानंतर पेंमेंट देण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ऑफरमध्ये भरा.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -