घरट्रेंडिंगमास्कमुळे मेकअपवर झाला परिणाम, ब्युटी प्रॉडक्टच्या व्यवसायात घट

मास्कमुळे मेकअपवर झाला परिणाम, ब्युटी प्रॉडक्टच्या व्यवसायात घट

Subscribe

घरी असल्यामुळे मेकअपची तशी जास्त गरज पडत नाही म्हणून महिलांचा ब्युटी प्रॉडक्ट घेण्याचा कल कमी झालाय

कोरोनापासून वाचायचे असेल मास्क लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर पडताना मास्क लावणे गरजेचे झाले आहे. मास्क घालणे अनिवार्य केल्याने मास्क बनवणाऱ्या व्यवसायाला मोठी मागणी आली. मात्र मास्कमुळे ब्युटी प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे घराबाहेर पडताना मास्क लावावा लागतो त्यामुळे प्रामुख्याने महिलांनी लिपस्टिक लावणे कमी केले. ब्युटी प्रॉडक्ट्सची मागणी कमी झाली त्यामुळे लिपस्टिकसह इतर ब्युटी प्रॉडक्टसच्या कंपन्यांवर मोठे संकट आले. मोठ्या कंपन्यांना कोट्यावधींच्या नुकसाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्यां अनेक पार्लना लॉकडाऊनच्या काळात पार्लर बंद करुन घरी बसावे लागले. त्यानंतरही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच जणांनी ब्युटी पार्लर त्याचप्रमाणे ब्युटी प्रॉडक्टकडेही पाठ फिरवली. त्यामुळे कोरोना महामारी सुरु झाल्यापासून गेल्या वर्षभरात ब्युटी प्रॉडक्ट क्षेत्राचे ७० टक्के नुकसान झाले आहे.

देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ब्युटी प्रॉडक्ट्सची मागणी कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेकांनी मागणी कमी झाल्याने आपला व्यवसाय बंद केला. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लग्न समारंभांवरही निर्बंध लावण्यात आले. लग्न सराईत मेकअप हा महिलांच्या फार जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र लग्न समारंभ,सण,सोहळे यांच्यावर निर्बंध आणल्याने महिलांचे नटणे,सजणे कमी झाले. घरच्या घरी सण साजरे होऊ लागले. त्याचप्रमाणे लग्नही काही माणसांमध्ये होत आहेत. त्याचप्रमाणे बऱ्यापैकी महिला घरुन काम करत आहेत. घरी असल्यामुळे मेकअपची तशी जास्त गरज पडत नाही म्हणून महिलांचा ब्युटी प्रॉडक्ट घेण्याचा कल कमी झाला.  त्यामुळे ब्युटी प्रॉडक्ट्स कंपन्या आणि बाजारपेठा कोलमडून गेल्या आहेत. लोकांनी जीवानश्यक वस्तूंना जास्त प्राधान्य दिल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

ब्युटी प्रॉडक्ट्सच्या बाजारात लॅकमे,एल-टीन,मॅबेलीन,लॉरिअल, रेवलॉल यांसारख्या दोन हजारांहून अधिक कंपन्या ब्युटी प्रॉडक्ट्स तयार करतात. ब्युटी प्रॉडक्टमध्ये प्रामुख्यांनी लिपस्टिक,नेलपेंट, आय लायनर, कॉमपॅक्ट,प्रायमर,ब्लश, मस्करा,आय शॅडो यासारख्या काही महत्त्वांच्या वस्तूंकडे महिलांनी पाठ फिरवली आहे.


हेही वाचा – ठाण्याच्या संभाजी नगरमध्ये मेट्रोचे पिलर उभारताना नाला बुजवला

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -