LPG Cylinder Price: आजपासून सिलिंडरच्या दरात घसरण, नवे दर काय?

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel Price) दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होते. यामध्ये गॅस सिलेंडरचेही (gas cylinder) भाव वाढल्याने सर्वसामन्यांच्या खिशाला मोठी कात्री लावली होती. मात्र, गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहेत नवे दर?

आज १ जून असून इंडियन ऑईलने नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १३५ रूपयांनी स्वस्त झाला आहे. १ जून रोजी दरात कपात केल्यानंतर आता दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर २३५४ ऐवजी २२१९ रूपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये २४५४ रूपयांचा सिलिंडर २३२२ रुपये, मुंबईत २३०६ ऐवजी २१७१.५० रुपये आणि चेन्नईत २३७३ ऐवजी २५०७ रुपयांना मिळणार आहे.

गॅस पुरवठादार कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमतीत तूर्तास तरी कोणताही बदल केलेला नाही. याआधी जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. कंपन्यांनी केलेल्या दरकपातीचा परिणाम आगामी काळात महागाईवर दिसून येईल, असे म्हटले जात आहे. यापूर्वी १ मे रोजी गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा : LPG Gas cylinder: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ

इंधन कंपन्यांनी मे महिन्यात दोन वेळेस एलपीजी गॅसची दरवाढ केली होती. इंधन कंपन्यांनी ७ मे रोजी ५० रुपयांची दरवाढ केली होती. त्यानंतर १९ मे रोजी ३.५ रुपयांची दरवाढ केली. मे महिन्यातही ५३.५ रुपये वाढवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमतीचा परिणाम देशातील गॅस दरावर होतो. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपयांची होणारी घसरणदेखील गॅसच्या दरावर परिणाम करते


हेही वाचा : Indian Militaryच्या लढाऊ विमानांमध्ये अस्त्र Mk-I क्षेपणास्त्रे बसवली जाणार, २९७१ कोटींचा करार