घरट्रेंडिंगRobot Marriage : एकटेपणाला कंटाळला अन् रोबोच्या प्रेमात पडला

Robot Marriage : एकटेपणाला कंटाळला अन् रोबोच्या प्रेमात पडला

Subscribe

एकटेपणामुळे प्रचंड हैराण झाला होता. त्याला वाचनाची खूप आवड आहे.एके दिवशी त्याच्या वाचनात एआय डॉलचा उल्लेख होता.त्यानंतर त्याने रोबोटला आपली मैत्रिण बनवण्याचे ठरवले,जेणेकरुन,त्याचा एकटेपणा दूर होईल.

प्रेम आंधळ असतं हे ऐकलं आणि पाहिलंसुद्धा असाल, मात्र एकटेपणाला कंटाळलेल्या ऑस्ट्रेलियाचा एक व्यक्ती चक्क रोबोटच्या प्रेमात पडला आहे.ऑस्टेलियाच्या एका व्यक्तीने खुलासा केला आहे की, तो लवकरच एका रोबोटसोबत विवाह बंधनात अडकला आहे. क्वीन्सलॅंडमध्ये राहणारा ज्योफ गैलाघर या व्यक्तीने सांगितले आहे की, जेव्हा माझ्या आईचे निधन झाले. तेव्हापासून  त्याचा पाळीव कुत्रा ‘पेनी’ याच्यासोबत एकट्याने आयुष्य काढले आहे. त्यानंतर त्याने त्याची इच्छाशक्ती संपून गेल्याचे सांगत त्याला कोणीच आयुष्यभर साथ देणारे भेटणार नाही,असे वाटू लागले.

ज्योफने सांगितले की,तो एकटेपणामुळे प्रचंड हैराण झाला होता. त्याला वाचनाची खूप आवड आहे. एके दिवशी त्याच्या वाचनात एआय डॉलचा उल्लेख होता. याशिवाय या रोबोट बाहुली 3 लाख रुपयांना विकत घेता येईल.त्यानंतर त्याने रोबोटला आपली मैत्रिण बनवण्याचे ठरवले,जेणेकरुन,त्याचा एकटेपणा दूर होईल. या तीन लाख रुपयांच्या बाहुलीची किंमत ही जास्त असून,ते रोबोट हसू शकते,बोलू शकते आणि त्याची त्वचा मानवासारखीच आहे.

- Advertisement -

त्यामुळे ज्योफने ही रोबोटची बाहुली विकत घेतली असून, या डॉलचे नाव ‘एम्मा’ असे ठेवले आहे. त्याने सांगितले की, ही रोबोट डॉल खूप सुंदर असून, निळे डोळे,पिवळी त्वचा आहे.त्याला पहिले असे वाटले की,इतकी महाग डॉल मी खरेदी करु शकणार नाही. ही डॉल या व्यक्तीने संप्टेंबरमध्ये 2019 मध्ये घेतली असून,ती त्याला इतकी आवडली की,या ज्योफने त्या डॉलशी लग्न करायचे ठरवले आहे.


हेही वाचा – Bulli Bai : मूर्खांना तुम्ही काय म्हणाल? जावेद अख्तरांनी ट्रोलर्सवर साधला निशाणा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -