घरट्रेंडिंग'त्याने' वाढदिवसाचा केक कापला आणि एकच हशा पिकला; व्हिडिओ व्हायरल!

‘त्याने’ वाढदिवसाचा केक कापला आणि एकच हशा पिकला; व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाने वाढदिवसाचा केक कापताच कुठून तरी एक माकड येतं आणि त्या तरुणाचा वाढदिवसाचा केक घेऊन धूम ठोकतो.

हल्ली इंटरनेटवर खूप सारे व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ पाहून खळखळून हसायला येते. असाच एक व्हिडिओ मागील काही दिवसांपासून नेटकऱ्यांना खळखळून हसवत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाने वाढदिवसाचा केक कापताच कुठून तरी एक माकड येतं आणि त्या तरुणाचा वाढदिवसाचा केक घेऊन धूम ठोकतो. असा हा व्हिडिओ आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

- Advertisement -

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

२१ सेकंदांचा असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माकड वाढदिवसाचा केक पळवताना दिसत आहे. एका तरुणाचा वाढदिवसानिमित्त मित्रमंडळी मिळून वाढदिवस साजरा करण्यात येत असून यावेळी मित्रमंडळी गाणं गाताना ऐकायला येत आहे. वाढदिवसाचा केक कापून होताच त्यातील एक तुकडा तरुण मित्रमंडळींना भरवण्यासाठी म्हणून उचलतो. पण त्याचक्षणी कुठून तरी एक माकड येतं. आणि तो कापलेला केक उचलून जवळील एका झाडावर माकड धूम ठोकतो. सर्वात हास्यास्पद म्हणजे व्हिडिओच्या शेवटी खळखळून हसण्याचा आवाज येतो. या व्हिडिओला प्रचंड लाइक्स मिळाले असून अनेकांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -