तुमचा रक्त गट कोणतंय? ‘या’ रक्त गटाच्या लोकांना Heart Attack चा धोका सर्वाधिक!  

धावपळीचे जीवन जगत असताना जगभरात सर्वाधिक लोकांना हृदयाशी संबंधित आजार असल्याचे समोर आले आहे. तर हेच हृदयाशी संबंधित असणारे आजार जगभरातील लोकांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरत आहेत. समोर आलेल्या एका अभ्यासातून असा दावा करण्यात आला आहे की, ज्या लोकांचा रक्तगट ‘ओ’ नाही, अशा लोकांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगितले जात आहे.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार ज्या लोकांना रक्तगट ‘ओ’ नाही अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा अधिक धोका संभवतो. संशोधकांनी ४ लाखांपेक्षा जास्त लोकांवर संशोधन केले. या संशोधनानंतर त्यांना असे आढळले की, रक्तगट ए किंवा बी असलेल्या लोकांमध्ये ओ रक्तगट असणाऱ्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा धोका हा ८ टक्क्यांपेक्षा अधिक असतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) ‘मेडिकल जर्नल्स आर्टेरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस आणि व्हॅस्क्यूलर बायोलॉजी’ मध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. यासह २०१७ मध्ये देखील युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी द्वारा एक अभ्यास करण्यात आला होता. ज्यामध्ये १३ लाखांहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये असे आढळले की, ओ रक्तगटाच्या लोकांना हृदयाच्या आजारासह हृदयविकाराचा धोका ९ टक्क्यांहून अधिक आहे.

एका संशोधनात संशोधनकर्त्याने A आणि B रक्तगट असणाऱ्यांची तुलना O रक्तगट असणाऱ्या लोकांशी केली. या अभ्यासात असे समोर आले की, O रक्तगट असणाऱ्या लोकांच्या तुलनेत B रक्तगट असणाऱ्या लोकांना मायोकार्डिअल इन्फ्रक्शन (हार्ट अटॅक) चा धोका १५ टक्क्यांनी अधिक आहे. तर O रक्तगट असणाऱ्या लोकांच्या तुलनेत A रक्तगट असणाऱ्या लोकांना हार्ट फॅल्यूअरचा धोका ११ टक्के अधिक असतो. हार्ट फॅल्यूअर आणि हार्ट अॅटक हे दोन्ही आजार हृदयाशी संबंधित आहे. परंतु हार्ट फॅल्यूअर झाल्यास रूग्णावर उपचार करण्यास पुरेसा वेळ मिळतो, तर हार्ट अॅटक अचानक आल्यास धोका अधिक असतो.

युरोपीयन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या मते, रक्तगट ओच्या तुलनेत इतर रक्त गटांमध्ये हार्ट अॅटक किंवा हार्ट फॅल्यूअरचा धोका जास्त असतो, कारण असे आजार असणाऱ्या लोकांमध्ये ब्लड क्लॉट निर्माण होण्याची शक्याता अधिक असते. २०१७ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे समोर आले की, नॉन-वीलब्रैंड फॅक्टरमध्ये (ब्लड क्लोटिंग तयार करणारं प्रोटीन) ओ रक्त गट वगळता इतर रक्त गटांमध्ये जास्त प्रमाण असते. म्हणून ओ रक्तगट असणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो.