घरट्रेंडिंगगर्लफ्रेंडने ९ महिने केलं प्रेग्नंट असल्याचे नाटक, बॉयफ्रेंडची कोर्टात धाव

गर्लफ्रेंडने ९ महिने केलं प्रेग्नंट असल्याचे नाटक, बॉयफ्रेंडची कोर्टात धाव

Subscribe

गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडमध्ये जेव्हा एखादा धोका देतो तेव्हा काय घडू शकते याच्या अनेक घटना आपण पाहिल्यात. अशाप्रकारे स्कॉटलडमधील एका महिलेने नऊ महिन्यांपर्यंत प्रेग्नंसीचे नाटक करत एक्स बॉयफ्रेंडला फसवण्याचा प्रयत्न केला. या महिलेने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला खोटे सांगितले की, तिच्या पोटात त्याचे मुल आहे. यासाठी या महिलेने गेली ९ महिने नकली बेबी बंप लावून नाटक केले. या महिलेच्या या नाटकामागचे कारण ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला. जॅकलीन मॅकगोवन नावाच्या या महिलेने आपल्या एक्स बॉयफ्रेंड जेमी इतकेनच्या आईला या प्रेग्नंसीची माहिती देत तिला हॉस्पीटलचे बनावट अपॉयमेंट् पेपरचे फोटो पाठवले. व जेमीच्या कुटुंबियांना जॅकलीन ९ महिन्यापर्यंत असे भासवत राहिली की, तिच्या पोटात जेमीचे मुल वाढतेयं.

डेली रेकॉर्डच्या रिपोर्टनुसार, ३६ वर्षांची जॅकलीन होणाऱ्या बाळाबद्दल बोलण्यासाठी वारंवार एक्स बॉयफ्रेंड जेमीच्या नातेवाईकांकडे जात होती. एकदा तर तिने कहर केला. ९ महिन्यांच्या प्रेग्नंट असणाऱ्या बाईसारखे नाटक करत ती जेमीच्या भावाच्या ऑफिसमध्ये पोहचली. व त्याला मदत करण्याची मागणी केली. या बनावट प्रेग्नंसीचे नाटक करण्यासाठी जॅकलीनने एक खोटा बेबी बंप खरेदी केला होता. जो ती सतत आपल्या कपड्यांच्या आत लावत होती. जॅकलीन लोकांना अशाप्रकारे फसवत होती की, तिने चक्क होणाऱ्या बाळाचे नाव नोहा ठेवणार असेही सांगून टाकले. तसेच लोकांना ही खोटी गोष्ट अधिक खरी वाटावी यासाठी ती डिलिव्हरी डेटबाबत सुद्धा लोकांशी चर्चा करत होती.

- Advertisement -

तिने जेमीच्या आईलाही तुम्हा लवकरचं आजी होणार असे सांगितले. जेमी तिच्यासोबत चेकअपसाठी येत नसल्याची तक्रार जेमीच्या आईला केली. जॅकलीनने जेमीच्या आईला पुढे सांगितले की, तिची डिलिव्हरी २० मार्च २०२० ला होईल व डिलिव्हरीनंतर त्यांना आपल्या नातवाचे संगोपन करायचे आहे. एक दिवस अचानक जॅकलीनने जेमीला बाळाच्या पाळण्याचा एक फोटो पाठवला आणि त्याच्याकडे २,९९,८८८ रुपयांची मागणी केली. आणि काही वेळानंतर जॅकलीनने जेमीला सांगितले की, तिचे बाळ मिसकॅरेज झाले. तसेच जेमीला तिने अनेक मॅसेज करत म्हटले की, त्याने बाळाच्या ९ महिन्यातील प्रोसेसमध्ये कोणतेही सहकार्य केले नाही. त्यानंतर तिने लगेच जेमीच्या आईशीही संपर्क केला.

जॅकलीनच्या या गोष्टींना वैतागून जेमीने जॅकलीनविरोधात कोर्टात केस दाखल केली. यावेळी कोर्टात जॅकलीनने कबूल केले की, तिने १ जून २०२९ पासून ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान जेमी आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला आणि खोट्या प्रेग्नंसीचे नाटक करुन घाबरवण्याचे काम केले. जॅकलीनने एक्स बॉयफ्रेंड जेमीवर नजर ठेवण्यासाठी हे सर्व केले, याशिवाय खोट्या प्रेग्नंसीचे नाटक करुन तिचा जेमीला लुबाडण्याचे होते. पर्थ शेरिफ कार्टात याप्रकरणाची सुनावणी सुरु होती. मागील सुनावणीदरम्यान जॅकलीन न्यायालयात हजर झाली नाही. परंतु तिने दिलेल्या जबाबात मान्य केले आहे की. हे सर्व करण्यासाठी तिने बनावट बेबी बंप लावत होती. या आरोपीसाठी जॅमीच्या वकिलांनी जॅकलीनला दोषी ठरवण्याची मागणी केली. याप्रकरणात न्यायालयाने म्हटले की, गा एक असामान्य आरोप आहे. आणि यासाठी बाकी रिपोर्ट पाहण्याची आवश्यकता आहे. जॅकलीनला मागील सुनावणीत दोषी ठरवण्यात आले नव्हते. मात्र, आता तिला पुढील महिन्यात शिक्षा सुनावण्याचा आदेश देण्यात आला आहे.

- Advertisement -

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -