घर Uncategorized ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून तिघांना अटक

ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून तिघांना अटक

Subscribe

हत्यारांचा मोठा साठा जप्त करण्यास मिळाले यश. ए.के. ५६ बरोबर ९५ काडतुसे हस्तगत.

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी तीघांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर हत्याराचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या हत्यारांबरोबरच यांच्याजवळून अंमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले. अटक करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. रबोदी या परिसरातून खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. मुंबईच्या नागपाडा परिसरात राहणारा जाहिद काश्मिरी(४७) आणि संजय श्रॉफ(४७) यांना अटक करण्यात आले आहे. यास्मिन खान या महिलेच्या घरावर छापा मारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे आरोपी हत्यार पुरवणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचा संक्षय पोलिसांना आहे. सध्या यांना अटक करुन पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून जाहिद काश्मिरी राहत असलेल्या ठिकाणाहून ‘एक ए के ५६’ सह ९५ जीवंतकाडतुसे, आणि एका पिस्तूलासोबत त्याची १३ जीवंतकाडतुसे जप्त केली. अटक आरोपी हे छोटा शकीलसाठी काम करत असल्याची माहिती ठाण्याचे आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. ठाणे खंडणी विरोधी पथकाला त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपाडा येथे राहणाऱ्या जाहिद काश्मिरी, यास्मिन खान आणि संजय श्रॉफ यांना पकडले आहे. घटनास्थळावरून जप्त केलेल्या मुद्देमालात तीन मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांचीही चौकशी सुरु असून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रावरून हल्ल्याचा प्लॅन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातीघांना आज न्यायालया समोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आले असल्याचे आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -