घरमहाराष्ट्र'मोदी-शहांना समजण्सासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील'

‘मोदी-शहांना समजण्सासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील’

Subscribe

'आज संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पण, वय वाढल्यानुसार राऊत यांच्या बोलण्यातील परिपक्वताही वाढावी, ही आमची अपेक्षा आहे', असे शेलार म्हणाले.

‘अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना समजण्यासाठी संजय राऊत यांना बरेच जन्म घ्यावे लागतील’, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आशिष शेलार म्हणाले. भाजपची आज संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या सुरुवातीला शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘आज संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पण, वय वाढल्यानुसार राऊत यांच्या बोलण्यातील परिपक्वताही वाढावी, ही आमची अपेक्षा आहे’, असे शेलार म्हणाले.


हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु करा; महाशिवआघाडीची मागणी

- Advertisement -

‘मोदींप्रती असणारे प्रेम आणि आदर स्वार्थी की निस्वार्थी ते जनता जानते’

‘संजय राऊत यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पण समाजामध्ये एक असा समज आहे, जसे वय वाढते तसे व्यक्ती परिपक्व बोलायला लागते. समाजाचा हा समज संजय राऊत यांनी जीवंत ठेवावा. त्यामुळे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. वय वाढल्यानुसार परिपक्वताही वाढावी, ही आमची अपेक्षा आहे. ज्या विषयावर काल त्यांनी भाष्ये केले त्या विषयावर मला एक गोष्ट स्पष्ट करावीसी वाटते की, काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींप्रती सन्मान आणि आदर व्यक्त केला. पण ते प्रेम आणि आदर स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे? हे महाराष्ट्र जानते. अमित शहाजींनी जी मुलाखत दिली त्यामध्ये कुणाला खोटे पाडण्यासाठी नाही तर महाराष्ट्राला सत्य समजण्यासाठी आपले कर्तव्य त्यांनी पार केले आहे. त्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी संजय राऊत यांना बरेच जन्म घ्यावे लागतील, असे स्पष्ट करतो’, असे आशिष शेलार म्हणाले.


हेही वाचा – कर्नाटकात भाजपची खेळी; अपात्र आमदारांना दिले तिकीट

- Advertisement -

…म्हणून आशिष शेलार यांनी साधला राऊत यांच्यावर निशाणा

गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

‘संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची बैठक’

‘भारतीय जनता पक्षाची आज संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ९० हजार बुथवर जाऊन भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करणे आणि त्या आधारावर संघटनेचा पाया हा अजून त्या ठिकाणी सखोलतेने जनतेपर्यंत पोहोचवणे या विषयावर देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पूर्ण राज्यातून येणारे आमचे जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्ह्यांचे निवडणुकांचे निरक्षक, सर्व आमदार, खासदार, सर्व प्रदेश पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील. सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई करायची आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उद्यापासून थेट बांधापर्यंत सर्व आमदार आणि विधानपरिषद सदस्य जातील’ असे शेलार भाजपच्या आजच्या बैठकीच्या रुपरेषेविषयी माहिती देताना म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -