घरअर्थजगतसिंधुदुर्गात कालव, जिताडा बीज उत्पादन केंद्र

सिंधुदुर्गात कालव, जिताडा बीज उत्पादन केंद्र

Subscribe

राज्यात सागरी उत्पादनवृद्धीस प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि कांदळवन व ‘सागरी जैवविविधता संवर्धन फाऊंडेशन’ने सिंधुदूर्ग येथे कालव बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेबरोबर (सीएमएफआरआय) तर जिताडा बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर क्वाकल्चर’ (सीबा) यांच्याबरोबर त्रिपक्षीय सेवा करार केला.

कालव आणि जिताडा ही दोन्ही मत्स्यबीज केंद्र वेंर्गुला (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील उभा दांडा येथे उभारण्यात येणार आहे. जिताडा मत्स्यबीज उत्पादन केंद्रामध्ये प्रतिवर्षी 20 लाख मत्स्यबीजाचे उत्पादन घेतले जाणार आहे. या केंद्राची उभारणी आणि संचालनासाठी ‘सीबा’तांत्रिक सहाय्य आणि सल्ला पुरविणार आहे. कालव बीज उत्पादन केंद्रामध्ये प्रतिवर्षी 1 कोटी बीजाची निर्मिती केली जाणार आहे.

- Advertisement -

सीएमएफआरआय आणि सीबा या दोन संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेशी (आयसीएआर) संलग्न असून मत्स्यसंवर्धन, संशोधन व विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत तसेच कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन फाऊंडेशनचे सहकार्य आणि आर्थिक सहाय्यातून हे मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -