घरCORONA UPDATECoronaVirus: पेन्शनच्या पैशातून ८२ वर्षांच्या आजीने दिली १ लाखाची मदत!

CoronaVirus: पेन्शनच्या पैशातून ८२ वर्षांच्या आजीने दिली १ लाखाची मदत!

Subscribe

सध्या कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक जणांचे मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने आपल्या राज्यातील सरकारला आणि नागरिकांनी मदत करत आहेत. अशाच प्रकारची मदत मध्य प्रदेशमधील एका वृद्ध महिलेने केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी एका वृद्ध महिलेने आपल्या पेन्शनच्या पैशातून एक लाख रुपयांची मदत केली आहे.

एका वृत्तपत्रात मदती संदर्भात वाचल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी सलभा उसकर यांनी आपल्या पेन्शन मिळणाऱ्या पैशातून एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

सद्याची परिस्थिती पाहता मी मदत करण्याचे ठरविले. मी लोकांनी लॉकडाऊन आणि सरकारच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करते, असे जनसंपर्क विभागाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ८२ वर्षांच्या सलभा उसकर यांनी म्हटलं आहे.

या ८२ वर्षांच्या सलभा उसकर यांचा व्हिडिओ मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून ‘माँ तुझे सलाम’ असं लिहिलं शेअर केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – CoronaVirus: १०१ वर्षांची कोरोनाबाधित वृद्ध महिला झाली रिकव्हर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -