घरट्रेंडिंगफेसुबक, इन्स्टा, व्हॉट्सअॅप गंडलं; सर्व्हर झाला डाऊन, तक्रारी सुरू!

फेसुबक, इन्स्टा, व्हॉट्सअॅप गंडलं; सर्व्हर झाला डाऊन, तक्रारी सुरू!

Subscribe

जगभरात कोट्यवधी लोक वापरत असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचा सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे फेसबुकच्या वापरकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. जगातल्या विविध भागांमधून फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सामना कराव्या लागणाऱ्या समस्यांच्या तक्रारी केल्या जात आहेत. यासाठी वापरकर्त्यांनी ट्विटरचा देखील आधार घेतला आहे. अनेक युजर्सनी त्यांचे फोटो दिसत नाहीत किंवा त्यांनी अपलोड केलेल्या पोस्ट दिसत नाहीत किंवा त्यांचे प्रोफाईल फोटो दिसत नाहीत किंवा व्हॉट्सअॅपवर फोटो डाऊनलोड होत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत. काही युजर्सनी अपलोड केलेले व्हडिओ देखील प्ले होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सर्व्हर डाऊन, तरी पेज कसं लोड होतं?

दरम्यान, ‘इंडिपेंडण्ट’ने डाऊन डिटेक्टर या ट्रॅकिंग वेबसाईटच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार युरोप, अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि जपानमध्ये या सर्व्हर डाऊनचा प्रामुख्याने प्रभाव दिसून आला आहे. पण त्यासोबतच जगभरातल्या काही हजार युजर्सना देखील तक्रारींचा सामना करावा लागला आहे. यामध्ये आपलं फेसबुक प्रोफईल जरी लोड होत असलं, आपल्या काही पोस्ट जरी दिसू शकत असल्या, तरी काही पोस्टला किंवा फोटोंना एरर येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे फेसबुक आणि त्यासोबतच त्यांच्याच सर्व्हरवरच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या सोशल नेटवर्किंग साईट आणि मेसेजिंक अॅपला देखील अडचणी येऊ लागल्या आहेत.

- Advertisement -

काय आहेत तक्रारी?

१) प्रोफाईल फोटो न दिसणे
२) आपण केलेली पोस्ट न दिसणे
३) आपण अपलोड केलेला विशिष्ट व्हिडिओ न दिसणे
४) व्हिडिओ प्ले न होणे
५) व्हिडिओ ब्लँक दिसणे
६) व्हॉट्सअॅपवरचे व्हिडिओ आणि फोटो डाऊनलोड न होणे

याआधी देखील मार्च महिन्यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बंद झाले होते. त्यानंतर फेसबुककडून त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर त्याबद्दल जाहीर माफी देखील मागण्यात आली होती. तसेच, युजर्सना लॉग इन करण्यात येणाऱ्या अडचणींसाठी सर्व्हर डाऊन ही समस्या कारणीभूत होती असं देखील फेसबुकनं मान्य केलं होतं. आता पुन्हा एकदा फेसबुकच्या काही फीचर्समध्ये अडचणी येऊ लागल्या असल्यामुळे सर्व्हरचीच समस्या असल्याचं बोललं जात आहे.

फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवरदेखील अडचणी येऊ लागल्याच्या तक्रारी काही युजर्सनी केल्या आहेत. त्यावर आता ट्विटरवर भन्नाट मीम्स देखील येऊ लागले आहेत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -