घरCORONA UPDATECorona: ...आणि पतीने माहेराहून आलेल्या पत्नीला घरातच घेतले नाही!

Corona: …आणि पतीने माहेराहून आलेल्या पत्नीला घरातच घेतले नाही!

Subscribe

कोरोनाची लागण आपल्याला तर होणार नाही ना, या भितीने माणसं आपल्याच माणसांकडे संशयाच्या नजरेने बघू लागली आहेत.

जगभरात कोरोनाचे संकट असताना या रोगाची भितीदेखील लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे. कोरोनाची लागण आपल्याला तर होणार नाही ना, या भितीने माणसं आपल्याच माणसांकडे संशयाच्या नजरेने बघू लागली आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात समोर आली असून येथे राहणाऱ्या इसमाने आपल्याच पत्नी माहेराहून परतल्यानंतर घरात घेण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा – एप्रिल महिन्यात १४ दिवस बँक बंद राहणार; जरूरी काम करुन घ्या

- Advertisement -

काय आहे प्रकरण

बिहारमधील सीवान जिल्ह्यातील राजानगर गावात राहणारी बबिता देवी (वय २८) यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी बलिया येथील गणेश प्रसाद यांच्याशी झाला होता. दोन महिन्यांपूर्वी त्या त्यांच्या माहेर गेल्या होत्या. त्यानंतर काल त्या सासरी परतल्या असून गणेश यांनी त्यांना कोरोनाचा संसर्ग होईल या भितीने घरात घेण्यास नकार दिला. पतीच्या आडमुठेपणामुळे बबिता यांनी जिल्हा हॉस्पिटलची वाट धरली. सध्या त्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये राहत आहेत. यावर बलिया शहरातील पोलिसांनी ही कौटुंबिक बाब असून पतीची समजूत काढली जाईल असेल म्हटले आहे.

हेही वाचा – धक्कादायक! ‘या’ राज्यात कोरोनाच्या भितीने केली सात जणांनी आत्महत्या

- Advertisement -

भारतात कोरोनाचे रुग्ण वाढले

भारतातील काही भागांमध्ये कोरोनाचा समुह संसर्ग वाढत असल्याने भारत कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये पोहचण्याची शक्यता वाढली आहे. तबलीगी जमातीच्या लोकांमुळे देशभरात कोरोनाचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आयसीएमआर लवकरच नवीन मार्गदर्शक नियमावली जाहीर करणार आहे. लॉकडाऊनच्या एक आठवड्यानंतर कोरोना हॉटस्पॉटच्या रुपात समोर आला आहे. यात मुंबई व दिल्लीतील काही ठिकाणांचा समावेश असून रोज येथे मोठ्या संख्येने कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यांना क्वारनटाईन जरी करण्यात येत असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून हे लोकं मुक्तपणे सगळीकडे फिरत होते. यामुळे कोरोनाचा समुह संसर्गाचा धोका वाढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -