घरदेश-विदेशमहाराष्ट्र पाठोपाठ आता कर्नाटकातही भाजपची अग्निपरीक्षा

महाराष्ट्र पाठोपाठ आता कर्नाटकातही भाजपची अग्निपरीक्षा

Subscribe

कर्नाटकात भाजपने जो राजकीय भूकंप घडवून आणला त्यावर सर्वसामान्य जनता मतदानाच्या माध्यमातून आपले मत मांडणार आहे. आज कर्नाटकात १५ मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या माध्यमातून जनता भाजपचे समर्थन करते का? ते आता कळणार आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने प्रचंड प्रयत्न केला. भाजपला २८८ जागांपैकी १०५ जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे भाजप राज्यातील सर्वाधिक जागांवर निवडून येणारा मोठा पक्ष ठरला. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्रीपदावरुन मित्रपक्ष शिवसेनेशी बिनसल्यामुळे भाजपला सत्ता टिकवता आली नाही. भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची मन वळवून सरकार स्थापन केले आणि ते सरकार स्थिर करण्यासाठी मोठ्या शताब्दीने प्रयत्नदेखील केले. मात्र, अखेर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीच्या तंबूत परतल्यामुळे भाजप महाष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या अग्निपरीक्षेत नापास ठरली. आता महाराष्ट्र पाठोपाठच भाजपची कर्नाटकातही तशीच परीक्षा आहे. कर्नाटकात भाजपने जो राजकीय भूकंप घडवून आणला त्यावर सर्वसामान्य जनता मतदानाच्या माध्यमातून आपले मत मांडणार आहे. आज कर्नाटकात १५ मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या माध्यमातून जनता भाजपचे समर्थन करते का ते आता कळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पाठोपाठ आता कर्नाटकातही भाजपची परीक्षा आहे.

…म्हणून कर्नाटकात १५ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी दोन महिन्यांअगोदर कर्नाटक राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता. कर्नाटकमध्ये भाजप पक्षाने सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना फोडले होते. या सर्व आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर बरेच राजकीय नाट्य बघायला मिळाले. दरम्यान, भाजपने सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस सरकारला विधानसभेत विश्वासाचा ठराव सिद्ध करण्याचे आवाहन केले. विश्वासाच्या ठरावाच्या वेळी बंडखोर १७ आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे कुमारस्वामी सरकार कोसळले. त्यानंतर कर्नाटकात भाजप सत्तेत आली. मात्र, बंड पुकारलेल्या त्या १७ आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले. त्यामुळे कर्नाटकात १५ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

- Advertisement -

फक्त सहा आमदारांसाठी भाजपचा खटाटोप

गेल्यावर्षी कर्नाटकात मतदान झाले होते. त्यावेळी भाजपला सर्वाधिक म्हणजे १०५ जगांवर यश मिळाले होते. यामध्ये भाजपला एका अपक्षाने पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपकडे सध्याच्या घडीला १०६ जागा आहेत. बहुमत मिळण्यासाठी ११२ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपला आणखी सहा किंवा त्यापेक्षा जास्त जागांची अपेक्षा आहे. अपात्र ठरलेल्या दोघांचा अपवाद वगळता १३ माजी आमदार भाजपच्या वतीने पोटनिवडणूक लढवित आहेत. मात्र, यामुळे भाजपचे जे मूळ नेते आणि कार्यकर्त्यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे तीन मतदापरसंघामध्ये भाजपमध्ये बंडाखोरी झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -