Live Update: मुंबई; वाढीव वीज बिलाविरोधात भाजप महिलांचा मोर्चा 

वाढीव वीज बिलाविरोधात भाजप महिलांनी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा वांद्रे कार्यलयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघही सहभागी झाल्या आहेत.


मुंबईतल्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. खडसे यांच्या अँटीजन आणि आरटीसीपीआर या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.


देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ८८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ९० लाख ४ हजार ३६६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


देशात १९ नोव्हेंबरपर्यंत १२ कोटी ९५ लाख ९१ हजार ७८६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १० लाख ८३ लाख ३९७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


भाजपच्या काळात वीज थकबाकी कशी वाढली? याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच  मंत्रिमंडाळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.


जगातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ कोटी ७२ लाख २८ हजारांहून अधिक झाला असून यापैकी आतापर्यंत १३ लाख ६५ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच ३ कोटी ९७ लाख १९ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


गुरुवारी दिवसभरात राज्यात ५,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,६३,०५५ झाली आहे. राज्यात ७९,७३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,३५६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा