घरदेश-विदेशमनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज; रेड अॅम्ब्युलन्समधून गोव्यात दाखल

मनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज; रेड अॅम्ब्युलन्समधून गोव्यात दाखल

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष विमानाद्वारे ते गोव्याल दाखल झाले आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रेड अॅम्ब्युलन्समधून मनोहर पर्रिकर गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झाले. तिथून ते गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहचले असून पर्रिकरावर पुढचे उपचार त्यांच्या निवासस्थानीच होणार आहेत. मनोहर पर्रिकर शुक्रवारपासून अतिदक्षता विभागात होते. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तरी देखील आज त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज जरी देण्यात आला. त्यांच्यासोबत एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक सुध्दा गोव्याला आले आहे.

- Advertisement -

स्वादुपिंडाच्या आजारामुळे मनोहर पर्रिकरांना १५ सप्टेंबर रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तरी देखील आज त्यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दाबोळी विमानतळावरून पर्रीकर यांना थेट त्यांच्या दोनापॉल येथील घरी नेण्यात आले. तेथे अम्ब्युलन्स, औषधांची सामुग्री असलेली व्हॅन सज्ज आहे.

संबंधित बातम्या –

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच असणार – अमित शहा

मनोहर पर्रीकरांना द्यायचाय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

मनोहर पर्रिकर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होणार

मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -