घरअर्थजगत'टाटास्टील'मधील ३ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

‘टाटास्टील’मधील ३ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

Subscribe

भारतात टाटा स्टीलला दुसऱ्या तिमाहीत २५५.८९ कोटींचा तोटा झाल्याने हा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला

आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांमधील कर्मचारी कपातीनंतर ‘टाटास्टील’च्या ३ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे. मागणीत घट आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळं टाटा स्टीलनं कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. युरोपातील ‘टाटास्टील’मधून जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतात टाटा स्टीलला दुसऱ्या तिमाहीत २५५.८९ कोटींचा तोटा झाल्याने हा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी युरोपातील टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक एडम यांनी कर्मचारी कपातीच्या सूचना देत तसे संकेत देखील दिले होते. त्यावेळी कंपनीकडून ठराविक कर्मचाऱ्यांची आकडेवारी सांगण्यात आली नव्हती. मात्र, आता कर्मचाऱ्यांची संख्या समोर आल्यानंतर कंपनीकडून ३००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याकारणांमुळे कर्मचारी कपातीचा निर्णय

मागणीत झालेली घट, व्यापारी अडचणी आणि अन्य समस्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात येणार आहे, त्यातील दोन-तृतीयांश कर्मचारी हे कार्यालयात काम करणारे असतील. मात्र, प्रकल्प बंद करण्यात येणार नाही, असे टाटा स्टील कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

भारतात टाटा स्टीलची अशी आहे आवस्था

कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत २५५.८९ कोटींचा तोटा झाला आहे. मागील वर्षीच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला ६०.७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या कालावधीत कंपनीच्या उत्पन्नात घट होऊन ते ४५८०.४७ कोटी रुपये झाले आहे. तेच एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ५९०७.४७ कोटी रुपये होते.


आयटी कंपनी ‘कॉग्निझंट’ नंतर ‘इन्फोसिस’मध्येही कर्मचारी कपात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -