घरमनोरंजन४० सिगरेट्स अमृताला पडल्या 'महागात'

४० सिगरेट्स अमृताला पडल्या ‘महागात’

Subscribe

‘राझी’ चित्रपटात महत्वाची भूमिका बजावल्यावर आता अभिनेत्री अमृता खानविलकर ‘हंगामा प्ले’च्या ‘डॅमेज’ या वेबसीरीजमध्ये झळकणार आहे. यानिमित्ताने अमृता पहिल्यांदाच डिजीटल दुनियेत पाऊल ठेवते आहे. राझीमध्ये मुनिरा नावाची साधी-सरळ पाकिस्तानी गृहिणी साकारणारी अमृता, डॅमेज या वेबसीरिजमध्ये मात्र बोल्ड आणि सेन्शुअस लविनाच्या रूपात दिसणार आहे.

सिगरेट पिण्यावाचून नव्हता पर्याय..

‘डॅमेज’मध्ये बिनधास्त, बेफिकीर अशी लविना साकारताना अमृताला सिगरेट पिणं अनिवार्य होतं. व्यक्तिगत आयुष्यात सिगरेटला हातही न लावणारी अमृता भूमिकेसाठी सिगरेट ओढायला तयार झाली खरी मात्र, सिगरेट ओढणं तिला मुळीच जमत नव्हतं. त्यामुळे अमृतासह संपूर्ण युनिटसमोर पुढे काय? असा प्रश्न उभा राहिला होता. युनिटकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिगरेट पकडण्यापासून ते एखाद्या व्यसनी माणसाप्रमाणे सिगरेट ओढण्यापर्यंतचा सराव अमृताला चांगलाच महागात पडला. शुटिंगच्या दरम्यान तिने एका दिवशी चक्क ४० सिगरेट ओढल्या. त्यानंतर तब्बल २ आठवडे अमृताच्या तोंडातून आवाजाच निघत नव्हता.

- Advertisement -

सिगरेटने केले बेजार

या अनुभवाविषयी बोलताना अमृता सांगते, ”एरवी मला सिगरेटच्या वासानेही मळमळतं. माझ्या आसपास कोणी सिगरेट ओढत असेल तर मी लगेच त्या व्यक्तीला रागावते. मात्र, मनोरूग्ण असेलल्या लविनाची भूमिका रंगवताना मला सिगरेट ओढणं भाग होतं. सिगरेट पिणं भूमिकेचा अविभाज्य हिस्सा असल्याने मी तयार झाले पण मला सिगरेट ओढणं जमेच ना. शूटिंगदरम्यान दिग्दर्शक सारखा इनहेल कर.. असं सारखं ओरडत होता पण सिगरेट इनहेल करून धूर सोडणं मला जमत नव्हतं. दिवसअखेरीला मला ते जमलं खरं पण त्या नादात मी एका दिवसात ४० सिगरेट प्यायल्या. दुसऱ्या दिवसापासून माझा घसा पूर्णपणे बसला. मात्र, त्रासाचा भाग वगळता शूटिंग करताना खूप चांगला अनुभव मिळाला.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -