घरमनोरंजनभय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही

Subscribe

अमेरिकन हॉरर आणि मॉन्स्टर चित्रपट आणि एकूणच पल्प सिनेमामध्ये झाँबी जॉनरमधील चित्रपटांना महत्त्वाचं स्थान आहे. अलिकडेच अमेरिकेत हॅलोविनचा उत्सव साजरा झालेला असताना या चित्रपट आणि मॉन्स्टर प्रकाराचा परिचय झाल्यापासून गेल्या पाच दशकांच्या काळात त्याच्यात झालेले बदल आणि त्याची अविरतपणे टिकून असलेली लोकप्रियता यांचा विचार करता या प्रकारातील एका कल्ट चित्रपटाकडे वळून पाहण्याची ही एक चांगली वेळ आहे.

‘नाईट ऑफ द लिव्हिंग डेड’चा (1968) दिग्दर्शक, संकलक, सहाय्यक लेखक आणि एकूणच सांगायचं झाल्यास सर्वेसर्वा जॉर्ज ए. रोमिरो हा झाँबीजचा आणि परिणामतः या चित्रपट प्रकाराचा जनक मानला जातो. त्याच्या या चित्रपटाने आणि पुढीलही कामाने भयपटांमध्ये अनेक आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं काम केलं. ते मुख्यतः या अर्थाने की असे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भयपटांचा उद्देश प्रेक्षकांना किंचाळायला लावणं आणि पारंपरिक तंत्रं वापरून एखाद्या वीकेंडला प्रेक्षकांना खूश करणारा चित्रपट बनवणं, इतकाच होता. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने जवळपास पहिल्यांदाच जम्प स्केअर्स नव्हे, तर कंटेंट ओरिएंटेड भयपटाची निर्मिती करून त्याने भयपटांचे स्वरूप बदलण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचं काम केलं.

बार्बरा (जुडिथ ओडिया) आणि तिचा भाऊ जॉनी (रसेल स्ट्रेनर) हे दोघे आपल्या वडिलांच्या थडग्याला भेट देण्यासाठी पेन्सिल्वेनियातील काहीशा ग्रामीण भागातील स्मशानभूमीकडे जात असतात. स्मशानभूमीत पोचल्यावर एक ‘घुल’सारखी दिसणारी (ज्याला पुढे जाऊन झाँबी म्हणून ओळख मिळाली) व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करते. त्याच्याशी झालेल्या झटापटीदरम्यान जॉनीचा मृत्यू होतो. तर या सगळ्या प्रकाराने आकर्षित झालेले इतर झाँबीज तिचा पाठलाग करत असताना कारचा अपघात झाल्याने बार्बराला तिथून पायीच वाटचाल करावी लागते. ती जवळच्या एका फार्म हाऊसवर पोचल्यानंतर तिथेही हाच प्रकार दिसून तिची पुन्हा एका झाँबीशी गाठ पडते. मात्र यावेळी सुदैवाने बेन (ड्युएन जोन्स) तिथे आल्याने तिची सुटका होते. ते त्या फार्म हाऊसवर आश्रय घेतात नि तिथे त्यांची भेट दोन जोडपी आणि त्यांतील एकाच्या आजारी मुलीशी पडते. या सर्वांच्या समोर उद्भवलेली परिस्थिती समजून घेण्याचा आणि अस्तित्त्वाचा लढा त्यापुढे सुरू होतो.

- Advertisement -

अर्थात हे झालं मूलभूत स्वरूपाचं कथानक. मात्र, ‘नाईट ऑफ द लिव्हिंग डेड’ त्यापलीकडे जाऊन मानवी भावभावना, परिस्थितीची हाताळणी असे बरेचसे आशय-विषय हाताळतो. जे त्यापूर्वी एरवी निर्बुद्ध, ‘क्राउड-प्लीजर’ समजल्या जाणार्‍या भयपटांमध्ये दिसून येत नसायचं. त्यामुळे यानिमित्तानं चित्रपटातील पात्रांना मानवी दृष्टिकोन लाभून त्यांना प्रेक्षकांच्या मनात संवेदना जागृत करण्यात यश मिळालं. याखेरीज साठ-सत्तरच्या दशकाच्या आधीच्या काळात भयपट आणि अगदी मुख्य प्रवाहातील चित्रपटांतही हिंसक दृश्यं, किळसवाणी गोअर दृश्यं यांचा समावेश तसा फारसा दिसून येत नसायचा. ‘नाईट ऑफ द लिव्हिंग डेड’ आणि नंतरचे रोमिरोचे ‘डेड’ सिरीजमधील चित्रपट, यांच्या निमित्ताने त्यालाही सुरुवात झाली. याखेरीज या चित्रपटाच्या निमित्ताने पन्नासच्या दशकातील अमेरिकन चित्रपटांतील ‘श्लॉक शॉक’ चित्रपट शैलीचंही पुननिर्माण झाल्याचंही मानता येतं.

या चित्रपटातील हिंसा आणि अगदी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूला सामोरं जाण्याच्या (आणि काही वेळा त्याचं कारण ठरण्याच्या) रूपात मानसशास्त्रातील जवळपास सर्वच सस्तन प्राणी आक्रमक असतात आणि बर्‍याचदा हीच गोष्ट त्यांच्या उत्क्रांतीमध्ये पूरक ठरलेली आहे. अगदी मानवदेखील याला अपवाद नाही. या तत्त्वाला पूरक ठरते. त्यामुळे ही आक्रमकता आणि पर्यायाने हिंसा त्यातील पात्रांना तसेच प्रेक्षकांना मानसिक पातळीवर खंबीर बनवते, असं मानता येतं. याखेरीज, चेीीं र्ींळेश्रशपीं रलीीं रीश ाशरपीं ीें लीळपस रर्लेीीं शींहळलरश्र रपव ोीरश्र र्र्िींशीींळेपी. – याचेही दृश्य स्वरूप अनुभवायला मिळते.

- Advertisement -

याद्वारे अनेक रिमेक्स, रिबूट्स आणि झाँबी जॉनर अस्तित्त्वात आणणारा ‘नाईट ऑफ द लिव्हिंग डेड’ अगदी मानसशास्त्र आणि समाजशास्त्रीय पातळीवर किती महत्त्वाचा आहे. याची कल्पना येते. शिवाय आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्याने भयपट आणि एकूणच चित्रपट या माध्यमात घडवून आणलेले बदल हेही त्याचं महत्त्व अधोरेखित करतात. ज्यामुळे त्याची परिपूर्णता त्याला या शतकातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक बनवते आणि तो आवर्जून पाहावा असा बनतो हे वेगळं सांगणं न लगे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -